ETV Bharat / entertainment

Pippa makers debunk rumours of OTT release : पिप्पा चित्रपट थिएटरमध्येच होणार रिलीज, निर्मात्यांनी अफवांचे केले खंडन

author img

By

Published : Mar 17, 2023, 5:46 PM IST

इशान खट्टर स्टारर पिप्पाच्या निर्मात्यांनी पिप्पाचे निर्माते आणि मल्टिप्लेक्स ऑपरेटर यांच्यात कोणतेही मदतभेद नसल्याचा खुलासा केला. हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार असल्याचेही सांगितले.

पिप्पा चित्रपट थिएटरमध्येच होणार रिलीज
पिप्पा चित्रपट थिएटरमध्येच होणार रिलीज

मुंबई - इशान खट्टरचा आगामी चित्रपट 'पिप्पा'च्या निर्मात्यांनी चित्रपट थिएटरमध्ये न येता ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चेला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत त्यांनी एका मासिकात खुलासा केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये १९७१ मध्ये झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरील या चित्रपटाचे प्रदर्शन थिएटरमध्ये ोणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसापासून पिप्पाचे निर्माते आणि मल्टीप्लेक्सचे मालक यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. याचाही खुलासा निर्मात्यांनी केला आहे.

1971 च्या लढाईवर आधारित 'पिप्पा'च्या हा चित्रपट डिजिटल पद्धतीने प्रदर्शित केला जाईल, अशा अफवा होत्या. चित्रपट निर्मात्यांना मल्टिप्लेक्स मालकांची अडचण होत असल्याच्याही अफवा पसरल्या होत्या. या सर्व अफवा चित्रपटाचे निर्माते रॉनी स्क्रूवाला, सिद्धार्थ रॉय कपूर आणि कमल ग्यानचंदानी यांनी चुकीच्या असल्याचे म्हटलं आहे. शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की आमच्याशी कोणताही संवाद न साधता काही वेब साईटनी या बातम्या चालवल्या होत्या. निर्मात्यांनी सर्व अफवांचे खंडन केले आहे. औपचारिक प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असेही ते म्हणाले.

हे काल प्रिंट मीडियामध्ये पिप्पा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार या शीर्षकाखाली चाललेल्या बातम्यांच्या संदर्भात पिप्पाचे निर्माते आणि मल्टिप्लेक्स ऑपरेटर यांच्यातील संघर्षांबाबत पूर्णपणे असमर्थित दावे केले गेले. या बातम्या छापण्यापूर्वी त्यांनी निर्माते किंवा कोणत्याही मल्टिप्लेक्स ऑपरेटरशी प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला गेला नव्हता, असं म्हटलंय. RSVP आणि रॉय कपूर पिक्चर्स आणि मल्टिप्लेक्स मालकांमध्ये कोणतेही निराकरण न झालेले मुद्दे नाहीत. अफवामध्ये केलेले सर्व दावे खोटे आणि असत्य आहेत. आम्ही सर्व भारतभरातील प्रेक्षकांना उत्कृष्ट आशय प्रदान करण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत. पिप्पाच्या रिलीजच्या प्रीमियर तारखेबाबत औपचारिक घोषणा लवकरच केली जाईल, असे निवेदनात म्हटलंय.

पिप्पा 1971 च्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सेट करण्यात आलेला चित्रपट आहे. समकालीन इतिहासातील सर्वात मोठ्या निर्वासित प्रवाहावर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे. ज्याचा परिणाम नंतर बांगलादेशच्या स्वातंत्र्य आणि स्थापनेमध्ये झाला होता.

हेही वाचा - Ananya Dance With Chunky Panday : अनन्या पांडेने अलनाच्या लग्नात डॅडी चंकी पांडेसोबत 'सात समुद्र पार'वर केला डान्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.