ETV Bharat / entertainment

Mahima Chaudhary Birthday : महिमा चौधरीनं 'या' चित्रपटापासून केलं होतं बॉलिवूडमध्ये पदार्पण...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2023, 2:57 PM IST

Mahima Chaudhary Birthday : महिमा चौधरी आज आपला 50वा वाढदिवस साजरा करतेय. तिनं आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. तिला चित्रपटात काम करण्याची पहिली संधी 'शोमन' सुभाष घई यांनी दिली. दरम्यान तिच्या वाढदिवसानिमित्त आज तिच्याबद्दल जाणून घ्या काही खास गोष्टी...

Mahima Chaudhary Birthday
महिमा चौधरीचा वाढदिवस

मुंबई - Mahima Chaudhary Birthday : बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी 13 सप्टेंबरला तिचा 50वा वाढदिवस साजरा करतेय. महिमा चौधरीचा जन्म पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये झाला. महिमाचं दहावीपर्यंतचं शिक्षण डाऊ हिल, कुर्सिओंग येथे झालं. त्यानंतर तिनं आपलं पूर्ण कॉलेज शिक्षण दार्जिलिंगच्या लोरेटोमध्ये केलं. महिमानं बॉलिवूडमध्ये दणदणीत पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटातून तिनं चाहत्यांची मनं जिंकली. मात्र तिला हिंदी चित्रपटसृष्टीत फार काळ टिकता आलं नाही. तिचा पहिला 'परदेस' चित्रपट रिलीज होण्यापूर्वी तिनं आपलं रितू हे मूळ नाव बदलून महिमा चौधरी असं ठेवलं. 'परदेस' चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष घई यांच्या सूचनेवरून तिनं आपलं नाव बदललं. सुभाष घई हे त्यांच्या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीसाठी 'एम' हे अक्षर लकी मानायचे. मिनाक्षी शेषाद्री, माधुरी दीक्षित, मनिषा कोईराला या अभिनेत्रींना चित्रपटात प्रमुख भूमिकेत घेऊन त्यांनी तयार केलेले चित्रपट खूप गाजले. रितू चौधरीचं महिमा चौधरी करण्यासाठी हे कारण पुरेसं होतं.

महिमाचं चित्रपटसृष्टीत पदार्पण : महिमा चौधरीनं 1990मध्ये आपलं शिक्षण सोडून मॉडेलिंगच्या जगात करिअर सुरु केलं. ती अनेक जाहिरातींमध्येही दिसली. महिमाला हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक सुभाष घई यांनी आणलं. सुभाष घईनी 'परदेस' चित्रपटातील 'गंगा'च्या भूमिकेसाठी महिमाची निवड केली. या चित्रपटात ती अपूर्व अग्निहोत्री आणि शाहरुख खानबरोबर दिसली होती. या चित्रपटातल्या भूमिकेसाठी तिला 'फिल्मफेअर'चा सर्वोत्कृष्ट पदार्पण कलाकाराचा पुरस्कारही मिळाला होता. महिमाच्या सौंदर्यामुळे पहिल्याच चित्रपटात तिची फॅन फॉलोइंग खूप मोठी झाली.'परदेस' नंतर 'दाग द फायर', 'प्यार कोई खेल नहीं', 'धडकन', 'खिलाडी 420' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम करून महिमा टॉप अभिनेत्रींपैकी एक बनली, मात्र एका अपघातानंतर तिचं करिअर उद्ध्वस्त झालं.

अपघातामुळं करिअर उद्ध्वस्त : महिमा त्या दिवसांत 'दिल क्या करे' या चित्रपटाचं शूट करत होती. एके दिवशी ती स्वत: गाडी चालवत सेटवर जात होती. यादरम्यान, समोरून येणाऱ्या ट्रकनं तिच्या कारला धडक दिली. या अपघातात महिमा गंभीर जखमी झाली आणि सुमारे 67 काचेचे तुकडे तिच्या चेहऱ्यात रुतले. या अपघातामुळे तिचा चेहरा खराब झाल्यामुळे तिनं इंडस्ट्रीला अलविदा केला. यावेळी अजय देवगणनं महिमाला साथ दिली. महिमा चौधरी त्या अपघाताच्या धक्क्यातून पूर्णपणं सावरली. त्यानंतर तिला कर्करोग झाल्याचं निदान झालं. आपल्या मुलीचं संगोपन करताना महिमा चौधरीनं कर्करोगावर उपचार घेतले. सध्या ती पूर्णपणे बरी आहे आणि कर्करोगासारख्या आजाराशी लढण्यासाठी समाजात जनजागृती करते.

माहिमाचं वैयक्तिक आयुष्य : माहिमा चौधरीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, महिमानं 2006 मध्ये आर्किटेक्ट बिझनेसमन बॉबी मुखर्जीसोबत लग्न केलं. या लग्नापासून तिला आर्याना चौधरी ही 11 वर्षांची मुलगी आहे. माहिमाचं हे लग्न फार काळ टिकलं नाही आणि 2013 मध्ये ते एकमेकांपासून वेगळे झाले. आता महिमा ही आपल्या मुलीसोबत राहते.

वर्कफ्रंट : माहिमा चौधरी वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती लवकरच कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. महिमा चौधरी या चित्रपटात प्रसिद्ध विदुषी पुपुल जयकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आता सध्या या चित्रपटातील महिमाचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. हा चित्रपट 24 नोव्हेंबर 2023 रोजी रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Happy birthday Prachi Desai : प्राची देसाईनं चित्रपटसृष्टीत कसं यश मिळवलं, जाणून घ्या तिचा आजवरचा प्रवास
  2. Satinder Kumar Khosla Death : बिरबल हरपला, ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतींदर कुमार खोसला काळाच्या पडद्याआड
  3. Haanji song out : भूमी पेडणेकर स्टारर 'थँक्स यू फॉर कमिंग'मधील पहिलं गाणं प्रदर्शित ; पहा व्हिडिओ...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.