ETV Bharat / entertainment

'बिग बॉस 17'च्या 'वीकेंड का वार'मध्ये करण जोहरनं दिला अंकिता लोखंडेला पाठिंबा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 13, 2024, 1:24 PM IST

Bigg Boss 17 New Promo: अंकिता लोखंडेची आई आणि सासूनं जेव्हा बिग बॉसच्या घरात प्रवेश केला, तेव्हा काही अशा गोष्टी घडल्या की ज्यामुळे हा एपिसोड चर्चेत आला. या भागामध्ये झालेल्या अंकिता आणि तिच्या सासूमधील मुद्द्यावर करण जोहरनं विकी जैनला काही प्रश्न विचारले. यानंतर करणने त्याला काय सुनावले हे वाचा.

Bigg Boss 17 New Promo
बिग बॉस 17 नवीन प्रोमो

मुंबई - Bigg Boss 17 New Promo: या आठवड्यात, अभिनेत्री अंकिता लोखंडेची आई आणि सासू, म्हणजेच विकी जैनच्या आईनं 'बिग बॉस 17'मध्ये प्रवेश केला, त्यानंतर हा एपिसोड खूप चर्चेत राहिला. या भागामध्ये अंकिताच्या सासूनं तिच्यावर टीका करत म्हटलं की, ''तुझी आई देखील तुझ्या वडिलांना चप्पल किंवा लाथानं मारत होती का ?, त्यानंतर याबद्दल बरीच चर्चाही झाली. आता हा मुद्दा पुन्हा एकदा 'वीकेंड का वार'मध्ये आला आहे. 'बिग बॉस 17'चा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये होस्ट करण जोहर विकी जैनला सांगतो की, ''एक पती म्हणून तू अंकिताच्या मागे उभे राहायला हवे.''

करण जोहरनं अंकिताला दिला पाठिंबा : त्यानंतर करणनं पुढं म्हटलं की, '' मी तुला तुझ्या आईविरुद्ध काहीही बोलू नये असं म्हणत नाही. पण अंकितासोबत तुझी आई काय बोलली हे तू विचारायला हवे.'' यानंतर अंकिता आणि विकी प्रोमोमध्ये बोलाताना दिसतात. विकी अंकिताला विचारतो की, ''तुझ्यासोबत आई काय बोलली हे सांग.'' त्यानंतर अंकिता सांगते की, ''तुझ्या वडिलांनी माझ्या आईला फोन करून विचारले की, तू तुझ्या पतीला अशा प्रकारे चप्पल आणि बूट फेकून मारत होती का?'' यानंतर विकी म्हणतो की, ''तुझे वडील आज असते तर काय केलं असतं. जेव्हा तुला काही गोष्टी हाताळता येत नाहीत, तेव्हा तू माझ्याकडे एका वेगळ्या अंदाजात येते ही गोष्ट राष्ट्रीय टीव्हीवर चांगली दिसत नाही. हे तू कधी समजणार.''

'बिग बॉस 17'मधील प्रोमो रिलीज : 'बिग बॉस 17'मधील या प्रोमोवर आता अनेकजण कमेंट्स करत आहेत. अनेकजण या मुद्यावर अंकिताला पाठिंबा देताना दिसत आहेत. एका युजरनं या पोस्टवर म्हटलं, ''विकी आता पण अंकिताला दोष देत आहे.'' दुसऱ्या एकानं म्हटलं, ''घराबाहेर गेल्यावर काय निर्णय होईल हे मला माहीत नाही. आशा आहे सर्व काही ठीक राहिल.'' आणखी एकानं लिहिलं, ''अंकितानं विकीला घटस्फोट द्यावा.'' अशा अनेक कमेंट्स या पोस्टवर येत आहेत. काहीजण या पोस्टवर सलमान खान यावेळी शोमध्ये असायला हवा होता, याबद्दल बोलत आहेत. 'बिग बॉस 17'मध्ये अंकिता आणि विकीचं नात काडीमोडच्या उंबरठ्यावर आहे.

हेही वाचा :

  1. राम राघवन दिग्दर्शित 'मेरी ख्रिसमस'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई
  2. महेश बाबू स्टारर 'गुंटूर कारम'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी केली जबरदस्त कामगिरी
  3. प्रभास, प्रशांत नीलसह टीमने साजरी केली 'सालार सक्सेस पार्टी'
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.