ETV Bharat / entertainment

Kangana Ranaut Visits Dwarkadhish: कंगना रणौतनं गुजरातेत जाऊन द्वारकाधीशला घातलं आशीर्वादासाठी साकडं

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 3, 2023, 5:29 PM IST

Kangana Ranaut Visits Dwarkadhish: बॉलिवूड क्वीन कंगना रणौतनं नुकतीच श्रीकृष्णाच्या नगरी द्वारकाधीशला भेट दिली आणि प्रार्थना केली. अलिकडेच रिलीज झालेला तिचा 'तेजस' चित्रपटही यश मिळवू शकलेला नाही. गेल्या काही वर्षात तिच्या नावावर फ्लॉप चित्रपटांची यादी वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर तिनं द्वारकाधीशचा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न केलाय.

Kangana Ranaut
कंगना रणौत

मुंबई - Kangana Ranaut Visits Dwarkadhish: अभिनेत्री कंगना रणौतनं गुरुवार 2 नोव्हेंबर रोजी गुजरातमधील श्री द्वारकाधीश मंदिराला भेट दिली. या मदिर भेटीचे फोटो तिनं आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काही दिवासापासून माझं मन खूप अस्वस्थ झालं होतं. श्रीकृष्णाच्या या दिव्य नगरीच्या धुळीचा स्पर्श होताच माझी काळजी दूर झाली आणि नतमस्तक झाले. आता माझं मन स्थिर झालंय आणि मनाला खूप आनंद झालाय. हे द्वारकाधिशा तुझा असाच आशीर्वाद राहू दे. हरे कृष्ण, असं कॅप्शन तिनं आपल्या पोस्टला दिलंय.'

कंगना रणौत स्टारर 'तेजस' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करत नाहीये. 27 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झालेला 'तेजस' बॉक्स ऑफिसवर आपटलाय. त्यामुळंही कंगना नाराज आहे. म्हणूनच तिनं द्वारकाधीशला जाण्याचा निर्णय घेतला. 'तेजस'मध्ये कंगना राणौत मुख्य भूमिकेत आहे. सर्वेश मेवाडा दिग्दर्शित 'तेजस'ने रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर फारशी समाधानकारक कमाई केलेली नाही. कंगना व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये अंशुल चौहान, वरुण मित्रा, आशिष विद्यार्थी, विशाक नायर, कश्यप शांगारी, सुनीत टंडन, रिओ कपाडिया, मोहन आगाशे आणि मुश्ताक काक यांच्याही भूमिका आहेत.

कंगनाच्या बॉक्स ऑफिसवर कोसळलेल्या चित्रपटांची यादी लांबत चालली आहे. 'तेजस' हा कंगना राणौतचा गेल्या आठ वर्षांच्या कारकिर्दीत बॉक्स ऑफिसवर सलग 11वा फ्लॉप चित्रपट ठरला आहे. 2015 मध्ये आलेला 'तनु वेड्स मनू' हा तिचा शेवटचा हिट चित्रपट होता. त्यानंतर तिचे अनेक फ्लॉप चित्रपट आले. यामध्ये 'आय लव्ह एनवाय', 'कट्टी बट्टी', 'रंगून', 'सिमरन', 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' आणि 'जजमेंटल' यांचा समावेश आहे. याशिवाय 'पंगा', 'थलाईवी', 'धाकड' आणि 'चंद्रमुखी 2' हे चित्रपटही याच यादीतील आहेत. आता ती बनवत असलेल्या 'इमर्जन्सी' चित्रपटाकडून तिला मोठ्या अपेक्षा आहेत. यात ती माजी पंतपर्धान इंदिरा गांधीची भूमिका साकरणार आहे. आणीबाणीच्या विषयावरील हा राजकीय पार्श्वभूमी असलेला चित्रपट आहे. आजवर या विषयावर अनेक चित्रपट बनलेत. परंतु अपेक्षित यश त्यांना मिळालेलं नाही. त्यातच पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणूकाही आहेत. त्यामुळे कंगनाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर सत्वपरीक्षा होणार आहे.

हेही वाचा -

1. Elvish Yadav Clarification Video : सापाच्या विषाची तस्करी करत असल्याचा आरोपाचं एल्विश यादवनं केलं खंडन

2. Vidya Karanjikar Strange Experience : बास्केटमधून होते कुत्र्यांच्या पिल्लांची डिलीव्हरी, अभिनेत्री विद्या करंजीकरांचा धक्कादायक अनुभव

3. Fir Against Elvish Yadav : एल्विश यादवच्या नसानसात भरलंय 'विष'? तस्करी प्रकरणी पाच साथीदारांसह 9 विषारी साप ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.