ETV Bharat / entertainment

Ishaan Khatter date with Chandni : गर्लफ्रेंड चांदनी बेंझसोबत डेट करताना दिसला इशान खट्टर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 12:06 PM IST

Ishaan Khatter date with Chandni : बॉलिवूडचा तरुण अभिनेता इशान खट्टर मॉडेल चांदनी बेंझसोबत डेट करत असताना क्लिक झालाय. मुंबईत शुक्रवारी रात्री एका कार्यक्रमात ही जोडी हातात हात घालून चालताना दिसली होती.

Ishaan Khatter date with Chandni
इशान आणि चांदनी बेंझ

मुंबई - Ishaan Khatter date with Chandni : अभिनेता शाहिद कपूरचा धाकटा भाऊ बॉलिवूड अभिनेता इशान खट्टर तरुण पिढीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. आपल्या अभिनय प्रतिभेनं त्यानं आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलीय. त्याच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच त्याचं खासगी रोमँटिक जीवन नेहमीच चर्चेचा विषय बनलंय.

इशान सध्या प्रेमात पडल्याचं बोललं जातंय. तो मलेशियातील मॉडेल चांदनी बेंजला डेट करत असल्याची कुजबुज ऐकायला मिळतेय. शुक्रवारी रात्री दोघं पहिल्यांदाच एकत्र फिरताना दिसले. ईशानने मात्र त्याच्या या प्रकरणाबद्दल अद्याप वाच्यता केली नाही.

इशान आणि चांदनी बेंझ नात्यात असल्याच्या चर्चा रंगल्या असल्या तरी दोघांनीही यावर मौन बाळगणं पसंत केलंय. ही जोडी त्यांचा मित्र ओजस देसाईची एंगेजमेंट साजरी करण्यासाठी एकत्र बाहेर गेली होती आणि ते निघून जाताना हातात हात घालून चालताना दिसत होते. विशेष म्हणजे इशानचा भाऊ शाहिद कपूरही या कार्यक्रमाला हजर होता.

या कार्यक्रमासाठी इशान खट्टरने निळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पँट परिधान केली होती. तर चांदनी बेंझ थाय हाय स्लिटसह गाउनमध्ये आकर्षक दिसत होती. तिने साध्या मेक-अपसह केस मोकळे सोडले होते. तिने आपला लूक बनवताना कमीतकमी अॅक्सेसरीज परिधान केल्या होत्या. इशानने आपल्या कथित प्रेयसीला पटकन कारमध्ये बसवलं आणि नंतर तो पापाराझींना फोटोसाठी पोज देताना दिसला. जाण्यापूर्वी त्यांनी काही चाहत्यांशी संवादही साधला.

इशान खट्टरनं 2017 च्या 'बियॉन्ड द क्लाउड्स' चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो अ सुटेबल बॉय, खाली पीली आणि फोन भूत यासारख्या चित्रपटात चमकला. तो आगामी राजा मेनन यांच्या 'पिप्पा' या युद्ध ड्रामामध्ये दिसणार आहे. आगामी नेटफ्लिक्स मालिका 'द परफेक्ट कपल'मध्येही हा ईशान महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

इशानच्या डेटिंगची ही पहिलीच चर्चा नाही. यापूर्वी त्याचं नाव अनन्या पांडेसोबत जोडलं गेलं होतं. २०२१ च्या 'व्हॅलेंटाईन डे'ला ही जोडी मुंबईतील वांद्रेतील एका रेस्टारंटमध्ये लंच डेट करताना दिसली होती. ते जेव्हा रेस्टारंटमधून बाहे पडले तेव्हा त्याचा हात अनन्या पांडेच्या खांद्यावर होता.

हेही वाचा -

Priyanka Chopra To Skip Wedding : 'रागनिती' विवाहाला प्रियांका चोप्राची दांडी, परिणीती राघवला इन्स्टावरुन दिल्या लग्नाच्या सदिच्छा

Film Based On Adi Shankaracharya : आदि शंकराचार्यंवर बनणार भव्य चित्रपट, आशुतोष गोवारीकरची घोषणा

Ji Le Jara film delayd : प्रियांका चोप्राच्या तारखा रखडल्या, 'जी ले जरा' चित्रपटाचं शुटिंग लांबणीवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.