ETV Bharat / entertainment

इशान खट्टरचा अंडर वॉटर ट्रेनिंग व्हिडिओ पहा

author img

By

Published : Dec 17, 2022, 3:24 PM IST

इंस्टाग्रामवर ईशानने पाण्याखाली त्याच्या मार्शल मूव्हसह चाहत्यांना खूश केले आहे. व्हिडिओमध्ये, अभिनेता हाताच्या काही हालचालींचा सराव करताना दिसला. त्याचा हा साहसी व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

इशान खट्टरचा अंडर वॉटर ट्रेनिंग व्हिडिओ
इशान खट्टरचा अंडर वॉटर ट्रेनिंग व्हिडिओ

मुंबई - बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर आगामी चित्रपटासाठी कठोर मेहनत करत असून यासाठी तो पाण्याखाली प्रशिक्षण घेत आहे. त्याने शुक्रवारी स्वत: चा पाण्याखाली प्रशिक्षणाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

इंस्टाग्रामवर ईशानने पाण्याखाली त्याच्या मार्शल मूव्हसह चाहत्यांना खूश केले आहे. व्हिडिओमध्ये, अभिनेता हाताच्या काही हालचालींचा सराव करताना दिसला. व्हिडिओमध्ये तो श्वास रोखून हातांच्या हालचाली सफाईदारपणाने करताना दिसत आहे.

व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले की, "माझ्या दोस्तांनो पाणी व्हा.''

व्हिडिओ पोस्ट होताच अभिनेत्याच्या चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील मित्रांनी कमेंट विभागात प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. इशानची आई नीलिमा अजीम यांनी एक कमेंट टाकली. तिने लिहिले, "अरे व्वा. हे खूप आश्चर्यकारक आहे." युजर्सपैकी एकाने लिहिले, "तर मग तू पाणीही पंच करू शकतो."दुसऱ्या एका युजर्सने त्याला "एक्वामन" म्हटले आहे.

इशानने इराणी चित्रपट निर्माते माजिद माजिदी यांच्या 'बियॉन्ड द क्लाउड्स' ('BTC') मधून मुख्य भूमिकेत पदार्पण केले. त्यानंतर 'धडक' या बॉलिवूड चित्रपटात त्याने लक्ष वेधून घेतले, याच चित्रपटातून दिवंगत श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर हिचे बॉलीवूड पदार्पण देखील केले.

इशान खट्टर अलीकडेच गुरमीत सिंग दिग्दर्शित आणि रवि शंकरन आणि जसविंदर सिंग बाथ यांनी लिहिलेला आणि 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या 'फोन भूत' मध्ये दिसला होता.इशान मृणाल ठाकूरसोबत 'पिप्पा' या पीरियड वॉर चित्रपटातही दिसला होता. 'एअरलिफ्ट' फेम राजा कृष्ण मेनन दिग्दर्शित हा चित्रपट 9 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल झाला.

हेही वाचा - बिग बॉस 16: अब्दू रोजिक बाहेर पडल्याने घरातील सदस्यांना धक्का

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.