ETV Bharat / entertainment

International Women's Day 2023 special: प्रतिभावंत ५ भारतीय महिला दिग्दर्शिकांनी फडकत ठेवलाय महिला केंद्रित चित्रपटांचा झेंडा

author img

By

Published : Mar 8, 2023, 3:27 PM IST

8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त चित्रपट उद्योगात महिलांनी दिलेल्या प्रचंड योगदानाची ओळख करुन घेणे आवश्यक आहे. महिला चित्रपट निर्मात्यांनी गेल्या काही वर्षांत अडथळे दूर केले आहेत, पूर्वकल्पनांना तोंड दिले आहे आणि जगभरातील प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या कलाकृतींची निर्मिती केली आहे. अशा पाच भारतीय महिला दिग्दर्शकांबद्दल आपण जाणून घेऊयात.

प्रतिभावंत ५ भारतीय महिला दिग्दर्शिकां
प्रतिभावंत ५ भारतीय महिला दिग्दर्शिकां

मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीतील महिला दिग्दर्शिका पुरुषप्रधान कथेला आव्हान देत आहेत आणि पडद्यावर नवीन दृष्टिकोन आणत आहेत. या पाच भारतीय महिला दिग्दर्शकांनी महिला चित्रपट निर्मात्यांच्या नंतरच्या पिढ्यांसाठी प्रगतीचा मार्ग खुला केला आहे. या पाच भारतीय महिला चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या स्वत:च्या दृष्टी आणि कथाकथनाने चित्रपट उद्योगात क्रांती घडवून आणली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, सिनेमाला एक नवीन दिशा देणाऱ्या महिला-केंद्रित चित्रपटांची ध्वजा फडकवत ठेवणाऱ्या प्रतिभावंत महिलांच्या कार्याकडे एक नजर टाकूया.

प्रतिभावंत भारतीय महिला दिग्दर्शिका मेघना गुलजार
प्रतिभावंत भारतीय महिला दिग्दर्शिका मेघना गुलजार

मेघना गुलजार तिच्या सूक्ष्म कथन सादर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिचे राझी आणि तलवार सारखे अत्यंत प्रशंसनीय आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरले आहेत. तसेच, ती तिच्या चित्रपटांमध्ये सामाजिकदृष्ट्या संबंधित महत्त्वपूर्ण आशय समाविष्ट करण्यासाठीही ओळखली जाते.

प्रतिभावंत भारतीय महिला दिग्दर्शिका झोया अख्तर
प्रतिभावंत भारतीय महिला दिग्दर्शिका झोया अख्तर

झोया अख्तरच्या चित्रपटांमध्ये एक अद्वितीय सौंदर्य आहे आणि ती तिच्या ऑफबीट कथानकांसाठी प्रसिद्ध आहे. तिने जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि गली बॉय सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत, ज्यांनी त्यांच्या मैत्रीसाठी, आत्म-शोधासाठी आणि सामाजिक भान जपत परिवर्तनाचा विचार मांडण्यासाठी खूप प्रशंसा मिळवली आहे.

प्रतिभावंत भारतीय महिला दिग्दर्शिका अलंकृता श्रीवास्तव
प्रतिभावंत भारतीय महिला दिग्दर्शिका अलंकृता श्रीवास्तव

अलंकृता श्रीवास्तव यांची स्टाईल समानता आणि स्त्री लैंगिकतेच्या परीक्षणासाठी ओळखली जाते. भारतीय सेन्सॉर बोर्डाने तिच्या लिपस्टिक अंडर माय बुरखा या चित्रपटावर बंदी घातली असली तरी, तिने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत आणि यासाठी तिचे समिक्षकांनी कौतुक केले आहे.

प्रतिभावंत भारतीय महिला दिग्दर्शिका नंदिता दास
प्रतिभावंत भारतीय महिला दिग्दर्शिका नंदीता दास

सुप्रसिद्ध दिग्दर्शिका असण्यासोबतच, नंदिता दास एक कुशल अभिनेत्री आणि प्रगतशील विचारांची प्रचारक आहे. 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलीच्या परिणामांवर लक्ष केंद्रित करणारा तिचा फीचर फिल्म डेब्यू फिराक समीक्षकांनी प्रशंसला होता. तिचा सर्वात अलीकडील चित्रपट मंटो सुप्रसिद्ध उर्दू लेखक सआदत हसन मंटोवर आधारित होता. ती सध्या डिलीव्हरी बॉइजच्या आयुष्याची करुण कहानी सांगणारा झ्विगाटो हा चित्रपट घेऊन प्रदर्शनासाठी सज्ज झाली आहे.

प्रतिभावंत भारतीय महिला दिग्दर्शिका गोरी शिंदे
प्रतिभावंत भारतीय महिला दिग्दर्शिका गौरी शिंदे

गौरी शिंदेच्या चित्रपटातील सहानुभूतीपूर्ण पात्रे आणि जीवनातील कथानकांनी तिला लोकप्रिय केले आणि चित्रपट खूप हिट झाले. तिचे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी दिग्दर्शन असलेल्या इंग्लिश विंग्लिश चित्रपटाने इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करताना भारतीय गृहिणीला येणाऱ्या अडचणींचा सामना यावर प्रकाश टाकला. तिच्या डियर जिंदगी या दुसऱ्या चित्रपटाला मानसिक आरोग्याच्या समस्या आणि समुपदेशनाचे महत्त्व याच्या चित्रणासाठी प्रशंसा मिळाली होती.

हेही वाचा - Mumbai Schedule For Jawan : शाहरुख आणि नयनताराच्या जवानचे मुंबईतील शुटिंग पूर्ण, टीम राजस्थानसाठी होणार रवाना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.