ETV Bharat / entertainment

IIFA Awards 2022 : जूनच्या पहिल्या आठवड्यात रंगणार 'आयफा' पुरस्कार सोहळा

author img

By

Published : May 18, 2022, 5:12 PM IST

आयफा पुरस्कार सोहळा २०२२
आयफा पुरस्कार सोहळा २०२२

बॉलिवूडच्या चाहत्यांना आता आयफा पुरस्कार सोहळ्याची जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही असे दिसते आहे, कारण आयफा पुरस्कारांचे वेळापत्रक पुन्हा केले गेले आहे आणि हा सोहळा आता जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल.

मुंबई - इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमीने ( Indian Film Academy ) आयफा ( IIFA ) वीकेंड आणि २२ वा पुरस्कार सोहळा जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. पूर्वी हा सोहळा मे महिन्यात अबु धाबी आयोजित होणार होता. परंतु युएईचे अध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान यांच्या निधनानंतर यूएईने 40 दिवसांचा शोक जाहीर केल्यानंतर हा सोहळा जुलैपर्यंत लांबणीवर टाकण्यात आला होता.

इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमीने मंगळवारी रात्री जारी केलेल्या प्रेस स्टेटमेंटमध्ये पुरस्कार सोहळ्याची नवीन तारीख जाहीर केली आहे. "सिनेमॅटिक उत्कृष्टतेचे प्रदर्शन करण्यासाठी जगाला एकत्र करून, आयफा पुरस्कार सोहळ्याची नवीन तारीख 2 ते 4 जून 2022 जाहीर करताना आनंद होत आहे. (आणि आमच्या आधी नमूद केल्याप्रमाणे जुलैमध्ये नाही)," असे आयोजकांनी एका निवेदनात म्हटले आहे.

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेता रितेश देशमुख हे बहुप्रतिक्षित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. या पुरस्कार सोहळ्यात रणवीर सिंग, कार्तिक आर्यन, वरुण धवन, सारा अली खान, अनन्या पांडे, दिव्या खोसला कुमार आणि नोरा फतेही यांच्यासह सिने व्यक्तिमत्त्वांचे परफॉर्मन्स दिसणार आहेत. सांस्कृतिक आणि पर्यटन विभाग अबू धाबी (डीसीटी अबू धाबी) आणि मिरल यांच्या सहकार्याने अबू धाबीच्या यास बेटावरील यास बे वॉटरफ्रंटचा भाग असलेल्या इतिहाद अरेना येथे हा कार्यक्रम होणार आहे.

हेही वाचा - Cricketer Shikhar Dhawan : शिखर धवनची बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री, जाणून घ्या चित्रपट कधी प्रदर्शित होणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.