ETV Bharat / sports

Cricketer Shikhar Dhawan : शिखर धवनची बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री, जाणून घ्या चित्रपट कधी प्रदर्शित होणार

author img

By

Published : May 18, 2022, 4:45 PM IST

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार ( Shikhar dhawan debut in bollywood ) असल्याची चर्चा आहे. या वर्षी तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे शिखर क्रिकेट व्यतिरिक्त अजून एका क्षेत्रात पाय रोवताना दिसणार आहे.

Shikhar Dhawan
Shikhar Dhawan

हैदराबाद : टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन ( Team India opener Shikhar Dhawan ) आता चित्रपटाच्या पडद्यावर नशीब आजमवताना दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिखर धवन एका मोठ्या चित्रपटासाठी स्वत:ला तयार करत आहे. मीडियानुसार, शिखरने चित्रपटाचे शूटिंग आधीच पूर्ण केले आहे. मात्र चित्रपटाचे शीर्षक आणि इतर गोष्टींबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिखर या चित्रपटाशी जोडला गेल्याने खूप खूश आहे. असे सांगितले जात आहे की शिखर चित्रपट कलाकारांचा आदर करतो आणि जेव्हा त्याला या चित्रपटाची ऑफर आली, तेव्हा त्याने हा चित्रपट करण्यास पासून मागे हटला नाही. तसेच, निर्मात्याने शिखर धवनला या भूमिकेसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून पाहिले होते. विशेष म्हणजे याच वर्षी शिखरला या चित्रपटासाठी अप्रोच करण्यात आले होते. शिखरची भूमिका मोठी असून महत्त्वाची असल्याचं सांगण्यात येत आहे. हा चित्रपट यावर्षी रिलीज होण्याची शक्यता आहे.

तुम्हाला आठवत असेल, तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शिखर धवन, अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरूचा स्टारर फिल्म 'राम सेतू'च्या सेटवर दिसला ( Shikhar Dhawan on Ram Setu set ) होता. त्यादरम्यान शिखरच्या बॉलिवूड डेब्यूची बरीच चर्चा रंगली होती. पण मीडियावर विश्वास ठेवला, तर शिखर तिथे फक्त अक्षय कुमारला भेटण्यासाठी गेला होता, कारण तो त्याचा चांगला आणि जवळचा मित्र आहे.

त्याचवेळी शिखर धवनही अभिनेता रणवीर सिंगसोबत ( Actor Ranveer Singh ) चर्चेत आला होता. शिखरने गेल्या वर्षी रणवीर सिंगसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा फोटो शेअर करत शिखरने लिहिले की, 'भाऊ, तुम्हाला प्रत्येक वेळी भेटणे आणि यावेळेसही चांगले होते, 83 च्या यशाबद्दल अभिनंदन, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला, अप्रतिम सिनेमा'. शिखर धवनला चित्रपट करणे आणि डांस करणे खूप आवडते.

हेही वाचा - Wrestler Satender Malik : कॉमनवेल्थ गेम्सच्या चाचण्यांदरम्यान रेफ्रीला मारहान केल्या प्रकरणी, कुस्तीपटू सतेंदरवर आजीवन बंदी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.