ETV Bharat / entertainment

Ganapath teaser out: टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉनच्या जबरदस्त अ‍ॅक्शनचा थरार, गणपथचा टीझर रिलीज

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2023, 1:47 PM IST

Updated : Sep 29, 2023, 3:05 PM IST

'गणपथ'चा बहुप्रतिक्षित टीझर शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटात क्रिती सेनॉन, टायगर श्रॉफ आणि अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत दिसत असून टायगर आणि क्रिती यांची ऑनस्क्रिन केमेस्ट्री छान जुळून आली आहे. तर अमिताभ समंजस वृद्धाच्या भूमिकेत आहे.

Ganapath teaser out
गणपथचा टीझर रिलीज

मुंबई - विकास बहल दिग्दर्शित 'गणपथ' चित्रपटामध्ये टायगर श्रॉफ, क्रिती सेनॉन आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिका आहेत. 'गणपथ'चा टीझर शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आला असून टायगर श्रॉफ यात जबरदस्त भूमिकेत दिसत आहे. यात त्याच्या वाट्याला भरपूर अ‍ॅक्शन सीन्स आले असून त्याची फेव्हरेट राउंड हाऊस किक, चेहऱ्यावर लाथ, काचेच्या भितीचा चुराडा आणि बॉक्सींग रिंगमधली मारामारी डोळे दीपवणारी आहे. रोमँटिक भूमिकेत असलेल्या क्रिती सेनॉनलाही यात तुम्ही अ‍ॅक्शन सीन्स करताना पाहू शकाल. या चित्रपटात अमिताभ बच्चन एका समंजस वयोवृद्ध व्यक्तीच्या भूमिकेत दिसत आहेत.

गणपथच्या या टीझरसह पूजा एंटरटेनमेंटने सिनेमॅटिक युगाची नव्यानं सुरुवात केली आहे. जगभरातील चाहत्यांना मनोरंजनाच्या जगात उत्तम अनुभव देण्याची खात्री यानिमित्तानं निर्मात्यांनी खात्री दिली आहे. गणपथ चित्रपटाच्या या टीझरमध्ये उत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स आणि वेधक कथानकासह एक अद्भूत करिष्मा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. व्हीएफएक्सच्या प्रभावी वापरानं टीझर वेगळा ठरलाय. या चित्रपटाची दृष्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची बनवण्यात निर्मात्यांना यश आल्याचं दिसतंय. चित्रपटाचे निर्माते जॅकी भगनानी यांनी प्रेक्षकांना जागतिक दर्जाचा सिनेमॅटिक एक्स्ट्राव्हॅगान्झा देण्याचा प्रयत्न करताना कोणतीहीकसर सोडलेली नाही. चाहत्यांनाही हा टीझर खूप आवडल्यचं प्रतिक्रियावरुन दिसत आहे.

गणपथची कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी असल्याचा दावा निर्मात्यांनी यापूर्वी केला होता. टीझरवरुन हा दावा खरा असल्याचं प्रेक्षक सांगत आहेत.एका अज्ञात क्षेत्रामध्ये आपल्या नशीबाचा शोध घेण्यासाठी निघालेल्या एका लढवय्या तरुणाची कथा रुपेरी पडद्यावर साकारली आहे. गणपथ चित्रपटाच्या प्रमोशनच्या प्लॅननुसार हा टीझर 27 सप्टेंबरला रिलीज व्हायचा होता. परंतु याची रिलीज लांबणीवर टाकण्यात आले आणि अखेर हा टीझर आज रिलीज करण्यात आलाय.

या चित्रपटाचं शीर्षक आणि कलाकार नेहमी चर्चेत कसे राहतील याची काळजी प्रमोशनमध्ये घेतली जात आहे. गणेश उत्सवाच्या काळात जय गणेशा हे गाणे रिलीज करण्यात आलं होतं. विशाल मिश्रा यांनी संगीतबद्ध केलंलं गाणं गणेश उत्वात आकर्षण ठरलं होतं.

गणपत: अ हिरो इज बॉर्न या चित्रपटाची निर्मिती वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल यांनी केली आहे. हा चित्रपट 20 ऑक्टोबर रोजी जगभरात हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -

  1. Salaar Vs Dunki Release Clash : सालार विरुद्ध डंकी बॉक्स ऑफिसवर सामना अटळ, प्रभासच्या पोस्टरसह निर्मांत्याची घोषणा

2. Ranbir Kapoor Birthday : पाहा, रणबीर कपूरने घराबाहेर चाहत्यांसोबत कसा साजरा केला वाढदिवस

3. South Actor Vishal: सेंट्रल बोर्डानं लाच मागितल्याचा दक्षिण अभिनेता विशाल कृष्णा रेड्डीचा आरोप, थेट सोशल मीडियातून जाहीर केली माहिती

Last Updated : Sep 29, 2023, 3:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.