ETV Bharat / entertainment

विकी जैननं पत्नी अंकिता लोखंडेला थप्पड मारण्याचा केला प्रयत्न , पाहा व्हिडिओ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 23, 2023, 5:27 PM IST

Bigg Boss 17 New Promo: 'बिग बॉस 17'च्या घरात रोजचं कुठल्याही कारणामुळं भांडण होताना दिसते. यावेळी अभिषेक कुमार आणि विकी जैनमध्ये वाद झाला. त्यानंतर अंकिता लोखंडे विकीला समजवण्यासाठी गेली असता त्यानं तिला मारण्याचा प्रयत्न केला.

Bigg Boss 17 New Promo
बिग बॉस 17चा नवीन प्रोमो

मुंबई- Bigg Boss 17 New Promo: 'बिग बॉस 17'च्या घरात प्रत्येक स्पर्धकामध्ये भांडणं पाहायला मिळत आहेत. मैत्रीपासून प्रेमापर्यंतच्या प्रत्येक नात्याचे रंग या शोमध्ये पाहायला मिळतात. अलीकडेच बिग बॉसमध्ये स्पर्धकांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. बिग बॉसच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये प्रेक्षकांना असे काही पाहायला मिळाले, ज्यामुळं सर्वांना धक्का बसला. अभिषेक आणि विकी जैन यांच्यात वाद सुरू होता, तर त्यांच्याजवळ बेडवर पडलेला अरुण त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देतो. त्यानंतर विकी आणि अभिषेक हे शांत होतात. विकी वारंवार अरुणला गप्प बसायला सांगतो.

  • During arguments, Vicky Bhaiya aggressively tried to get out of the blanket and looked like he was trying to hit his wife Ankita Lokhande on national television 😱😱😱pic.twitter.com/9s7roCZy8A

    — #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) December 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विकी जैननं अंकिता लोखंडेला मारण्याचा केला प्रयत्न : या भांडणाच्या वेळी अंकिता लोखंडे देखील विकीला वारंवार समजावून शांत राहण्यास सांगते. यावर विकी आपला संयम गमावून बसतो आणि काहीही विचार न करता तो अंकितावर हात उगारण्याचा प्रयत्न करतो. विकी जैनच्या या कृतीनं अंकिताही घाबरली. यानंतर, विकी रागानं बेडवरून उठतो आणि अभिषेकला दुसऱ्या बाजूला चल म्हणतो. विक्की जैनचं असे वागणे पाहून अरुणही थक्क होतो आणि म्हणतो, ''अरे देवा, हे काय बघायला मिळाले''. विकी जैन हा बिग बॉसच्या घरात अनेकदा आक्रमक होतो. अंकिता आणि विकीमध्ये अनेकदा बिग बॉसच्या घरात वाद होताना दिसतात.

विकी जैन आणि अंकिता लोखंडेला चाहत्यांनी समजावले : विकी जैन आणि अंकिता लोखंडेची आई बिग बॉस घरात आल्या होत्या. त्यांनी या जोडप्याला न भांडण्याचा सल्ला दिला होता. या कपलमध्ये अनेकदा तक्रार होते, त्यामुळं अंकिताचे चाहतेही नाराज आहेत. काही चाहत्यांनी अंकिताला विकीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. अंकिता आणि विकीच्या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करून विकीला फटकारलं आहे. एका यूजरनं लिहिल, ''विकी तु चांगला राहू शकत नाही का ?'' दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, ''विकी तु असा वाईट असणार हे माहित नव्हत'' याशिवाय आणखी एकानं लिहिलं, ''अंकिता या विकीला सोडून दे. तू चांगल्या व्यक्तीसोबत राहा'' अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत.

हेही वाचा :

  1. प्रभासच्या 'सालार' वादळापुढे अडखळला शाहरुखचा 'डंकी', कमाईत घसरण
  2. प्रभास स्टारर 'सालार'ने पहिल्या दिवशीच्या कमाईचे सर्व अंदाज ओलांडले
  3. 'कल्कि 2898 एडी' पासून 'पुष्पा 2' पर्यंत हे 10 साऊथ चित्रपट 2024 मध्ये होतील प्रदर्शित
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.