आलिया भट्टच्या मताशी दीपिका पदुकोण सहमत, '12th Fail' वर केला कौतुकाचा वर्षाव

author img

By ETV Bharat Marathi Desk

Published : Jan 17, 2024, 9:50 AM IST

Vikrant Masseys 12th Fail

Vikrant Masseys 12th Fail :आलिया भट्टपाठोपाठ दीपिका पदुकोणनेही विक्रांत मॅसी स्टारर '12th Fail' चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला. दीपिका आलियाच्या चित्रपटाच्या प्रतिक्रियेशी सहमत आहे. आलियानं शेअर केलेली प्रतिक्रिया रीपोस्ट करत तिने आपलंही म्हणणं हेच असल्याचं म्हटलंय.

मुंबई - Vikrant Masseys 12th Fail : अभिनेता विक्रांत मॅसीची मुख्य भूमिका असलेला '12th Fail' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर त्याला बॉक्स ऑफिसवर थंड प्रतिसाद मिळाला. मात्र चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक सकारात्मक बोलू लागले. समीक्षकांनीही चित्रपटाचे भरभरुन कौतुक केलं. चित्रपटाबद्दल जेव्हा प्रेक्षक चांगलं बोलू लागतात तेव्हा त्याचा उत्तम परिणाम होतो हे या चित्रपटानं पुन्हा सिद्ध करुन दाखवलं. चाहत्यांनी विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित '12th Fail' चित्रपटाची प्रशंसा केल्यानंतर, दीपिका पदुकोणदेखील स्तुतीसुमने उधळणाऱ्यांमध्ये सामील झाली आहे. हा उत्कृष्ट चित्रपट निर्माण केल्याबद्दल तिनं टीमचं कौतुक केलं.

Vikrant Masseys 12th Fail
'12th Fail' वर केला कौतुकाचा वर्षाव

'12th Fail' चित्रपटाबद्दल आतापर्यंत अनेक लोकांनी प्रतिक्रिया देत आवडल्याचं म्हटलं होतं. यामध्ये सामान्य प्रेक्षकांपासून ते फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गजांचा समावेश होता. यामध्ये कमल हसन, ऋषभ शेट्टी, संजय दत्त, आलिया भट्ट, फरहान अख्तर, हृतिक रोशन, अनुराग कश्यप, कंगना रणौत, रोहित शेट्टी आणि अनिल कपूर आदींनी या चित्रपटाचे कौतुक केलं आहे.

बायोग्राफिकल ड्रामा फिल्म '12th Fail' २७ ऑक्टोबर २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाली. सुरुवातीला या चित्रपटाकडे फारसे लक्ष यश मिळाले नसले तरी मिळत असलेला प्रतिसाद खूपच दिलासा देणारा होता. विशेष म्हणजे या चित्रपटावर टीका करणारा अपवादानेही सापडत नव्हता. त्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रसारित व्हायला सुरुवात झाली आणि घरोघरी या चित्रपटाचे जोरदार स्वागत झालं. दीपिका पदुकोण देखील चित्रपटातील संपूर्ण कलाकार आणि क्रू पाहून प्रभावित झाली होती. त्यांना तिच्या शुभेच्छा देताना दीपिकाने सोशल मीडियावर आलिया भट्टची प्रतिक्रिया रीपोस्ट केली आणि लिहिले, "मला याहून अधिक काही म्हणायचे नाही. सर्व कलाकार आणि क्रूचे अभिनंदन."

विक्रांत मॅसी, मेधा शंकर आणि अनंत व्ही जोशी यांच्या अभिनयाची प्रशंसा करण्यासाठी आलिया भट्टने यापूर्वी इन्स्टाग्राम स्टोरीजवर ही प्रतिक्रिया पोस्ट केली होती. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना तिने लिहिले, "अलिकडच्या काळात अप्रतिम अभिनयासह मी पाहिलेल्या चित्रपटापैकी हा एक सुंदर चित्रपट होता. अगदी खूप सुंदर! विक्रम मॅसी तू खूप नेत्रदीपक होतास, मी आश्चर्यचकित झाले आहे! मेधा शंकर ही मनोजच्या या प्रवासातील आत्मा आणि हृदय होती. खूप खास आणि फ्रेश आणि सर्व गोष्टी अगदी हृदयस्पर्शी. अनंत व्ही जोशी उत्कृष्ट!"

'12th Fail' चित्रपटाच्या दिग्दर्शकाविषयी बोलताना आलियाने लिहिले: "आणि शेवटी विधू विनोद चोप्रा सर - हा चित्रपट खरोखरच स्पॉट हिट आहे! खूप चालणारा. खूप प्रेरणादायी. खूप पूर्ण! हा चित्रपट पाहिल्यानंतर मी पूर्ण प्रेमाने भरले आहे! संपूर्ण कलाकार आणि क्रूला वाकून नमस्कार."

'12th Fail' चित्रपट मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित एक प्रेरणादायी कथा आहे. त्यांनी भयंकर गरिबीवर मात केली आणि भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी होण्यासाठी कठोर संघर्ष केला. विक्रांत आणि मेधा व्यतिरिक्त, यात अनंत व्ही जोशी, अंशुमान पुष्कर आणि प्रियांशू चॅटर्जी महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

हेही वाचा -

  1. उद्योगांपाठोपाठ फिल्मफेअरही गुजरातला, हा तर मुंबईतील फिल्म इंडस्ट्री पळवण्याचा डाव?
  2. अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट 'कंगुवा'मधील दुसरे पोस्टर रिलीज
  3. विजय सेतुपती वाढदिवसानिमित्त 'हे' 5 चित्रपट जरूर पाहा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.