ETV Bharat / entertainment

सना रईस खाननं काम करण्यास नकार दिल्यानं बिग बॉसमध्ये गृहकलह

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 10:19 AM IST

Updated : Dec 6, 2023, 2:19 PM IST

Bigg Boss 17 day 52 highlights: सना रईस खान हिनं घरात काम करण्यास नकार दिल्यानं बिग बॉसच्या घरात गोंधळ उडाला. बिग बॉसनं तिला असे करण्यास संमती दिली आणि त्याच्या मोबदल्यात घरातील सदस्यांचं अर्धे रेशन बंद केले. त्यानंतर संपू्र्ण घरातील संदस्यांमध्ये फूट पडल्याचं दिसलं. या भागात पुन्हा एकदा अंकिता लोखंडेनं तिचा दिवंगत माजी प्रियकर सुशांत सिंग राजपूतची आठवण काढली.

Bigg Boss 17 day 52 highlights
बिग बॉसमध्ये गृहकलह

मुंबई - Bigg Boss 17 day 52 highlights: बिग बॉसच्या घरातील गृहकलह ही काही नवीन गोष्टी राहिलेली नाही. सना रईस खाननं घरातील कामांना नकार दिल्यामुळे संपूर्ण घर तिच्या विरोधात उभे राहिले. दुसरी, परवलीची झालेली गोष्ट म्हणजे अंकिता लोखंडेनं तिचं जुनं रडगाणं सुरू ठेवलं आणि सुशांत सिंग राजपूतची आठवण काढली.

अंकिता लोखंडेनं केली सुशांत सिंग राजपूतच्या मेहनतीची तारीफ

अंकिता लोखंडेने बिग बॉसच्या घरात 52 व्या दिवशी तिचा दिवंगत माजी प्रियकर सुशांत सिंग राजपूतच्या आठवणी सांगितल्या. चित्रपटसृष्टीत कसा प्रवास करायचा या अभिषेक कुमारच्या प्रश्नाला अंकितानं उत्तर दिलं. ती म्हणाली की, त्यालाच हा मार्ग शोधून काढावा लागले. सुशांतला जेव्हा सिनेसृष्टीत प्रवेश करायचा होता तेव्हा त्यानं केलेली अथक मेहनत आणि 'काई पो चे' चित्रपटातील पदार्पणाच्या भूमिकेसाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण करून दिली. 'एम.एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटासाठी दोन वर्षे तो क्रिकेटच्या मैदानावर खेळत होता.

सना रईस खानचा घरातील कामे करण्यास नकार

मंगळवारी प्रसारित झालेल्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांचं लक्ष स्वतःकडे खिळवून ठेवलं. पेशानं वकिल असलेल्या सनानं आजारी असल्याचं सांगत घरकाम करण्यास किंवा भांडी धुण्यास नकार दिला. तिच्यावर जबाबदारी असलेलं काम करण्यास तिनं नकार दिल्यामुळे इतर सदस्य तिच्यावर भडकले आणि गोंधळाला सुरुवात झाली.

बिग बॉसनं केली रेशन कपात

सनाला बिग बॉस कडून कन्फेशन रूममध्ये कॉल आला आणि तिला कळवलं की तिला कोणतेही घरकाम दिलं जाणार नाही, परंतु संपूर्ण घराला त्या बदल्यात फक्त अर्धा रेशन मिळेल. याला तिनं सहमती दाखवली आणि म्हटलं, "मला खरोखरच ऑफर स्वीकारायला आवडेल." त्यानंतर बिग बॉसनं सर्वांना तसे कळवलं आणि त्यांचे अर्धे रेशन बंद केल्याचं सांगितलं.

सना रईस खानच्या निर्णयावर घरातील सदस्यांची प्रतिक्रिया

घरातील सदस्यांच्या रेशनमध्ये अर्धी कपात झाल्यामुळे आणि तीही केवळ सना खानला काम करण्यास कंटाळा आल्यामुळे ही गोष्टी काही इतर सदस्यांना पटली नाही. हा निर्णय कळल्यापासून इतर स्पर्धकांनी तिच्या नावानं बोटं मोडायला सुरुवात केली. रिंकू धवनने सनाला स्वार्थी म्हटल. याला उत्तर देताना सना म्हणते, "मी स्वार्थी आहे, हा एक खेळ आहे." खानजादी तिच्या डावपेचांनाही आव्हान दिलं. मात्र, मन्नारानं तिला साथ दिली आणि तिच्या पाठीशी उभी राहिली. सनाला पाठीशी घालण्याचा निर्णय ईशानंही घेतला. घरातील सदस्यांच्यातच फूट पडल्यानं गोंधळात भर पडली.

मन्नारा चोप्रा आणि मुनावर फारुकीमध्ये गैरसमज

बिग बॉसच्या घरात मन्नारा चोप्रा आणि मुनावर फारुकी यांच्यातही वादाची ठिणगी पडली. "तू माझा पूर्वीसारखा दोस्त राहिला नाहीस", असं मन्नारा म्हणाली. याला उत्तर देताना फारुकी म्हणाला की, "मी तुझ्या छत्रछायेखाली का राहू, विनाकारण टोमणं मारायचं बंद कर."

बिग बॉस शोचं 17 वं पर्व सुरू असून मंगळवारी 52 वा भाग प्रसारित झाला. सोमवार ते शुक्रवार हा शो 10 वाजता प्रसारित होतो आणि शनिवारी व रविवारी 'विकेंड का वार' साडे नऊ वाजता प्रसारित होतो. या आठवड्यात घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेल्या सदस्यांमध्ये विकी जैन, नील भट्ट, अनुराग डोभाल, अरुण मशेट्टी, सना रईस खान, मुनावर फारुकी, विकी जैन आणि खानजादी यांचा समावेश आहे.

हेही वाचा -

1. ममता बॅनर्जींनी केला सलमान खानसोबत डान्स, व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्ही पण एकदा पाहाच

2. नव्या नंदानं शेअर केले भाऊ अगस्त्यसोबतचं सुंदर फोटो

3. रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'चं रानटी कलेक्शन, 4 दिवसांत 400 कोटींचा टप्पा पार

Last Updated : Dec 6, 2023, 2:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.