ETV Bharat / entertainment

भारती सिंह, हर्ष लिंबाचिया आणि ढिंचक पूजा 'बिग बॉस 17'च्या वीकेंड का वारमध्ये लावणार हजेरी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 14, 2023, 5:30 PM IST

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'मध्ये मुनावर हा बिग बॉसच्या घरातील पहिला कॅप्टन बनला आहे. याशिवाय या शोमध्ये भारती सिंह, हर्ष लिंबाचिया आणि ढिंचक पूजा हे कलाकार दिसणार आहेत.

Bigg Boss 17
बिग बॉस 17

मुंबई - Bigg Boss 17 : अभिनेता सलमान खानचा शो 'बिग बॉस 17'ला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. या शोमध्ये रोजच भांडणं पाहायला मिळतात. मुनावर फारुकी बिग बॉसचा कॅप्टन झाल्यामुळं अंकिता लोखंडे खूप आनंदी होती, मात्र मुनावरचं तिला शिक्षा देणारा पहिला असेल याची कल्पना अंकितानं केली नसेल. 'बिग बॉस 17'मध्ये नुकतीच अंकिताची तब्येत बिघडली होती. याबाबत अंकितानं बाहेर डॉक्टरांना तिच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली. दरम्यान या शोचा एक प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोममध्ये बिग बॉस म्हणतात की, ''मी मुनावर एक ऑडिओ क्लिप ऐकवतो, जी आजपर्यंत प्रेक्षकांनी किंवा या भागातील इतर कोणत्याही सदस्यानं ऐकली नाही. यानंतर मुनावर ऑडिओ काळजीपूर्वक ऐकतो. बिग बॉस या ऑडिओवर म्हणतात की, ''तुला मुनावर हे योग्य वाटतं का?'' यावर मुनावर म्हणतो,'' अंकिताला अशा सुविधा दिल्या जात असेल तर हे अयोग्य आहे''.

मुनावर घेतो अंकिताचा क्लास : प्रोमोमध्ये मुनावर पुढं म्हणतो, ''विकी भाई, अंकिता लोखंडे, तुमच्याकडे मेडिकलसाठी येणारे कोणीही असतील, तुम्ही त्यांच्याशी काहीही बोलू शकत नाही आणि हे योग्य नाही. त्यानंतर अंकिता विचारते मी काय बोलले? यावर मुनावर म्हणतो ''मी सर्व ऐकले आहे आणि म्हणूनच मी बोलत आहे''. यानंतर अभिषेक म्हणतो की, ''मला हे प्रकरण काय आहे ते दाखवण्यात आले नाही, त्यामुळं माझा यावर विश्वास बसत नाही''. हे अन्यायकारक असल्याचं बाकी घरातील इतर सदस्यही म्हणतात. यावर अंकिता रडते. तिला विकी शांत करतो. मुनावर आता अंकिताला काय शिक्षा देणार हे आगामी भागात समजेल.

ढिंचक पूजा करेल बिग बॉसच्या घरात प्रवेश ? : दरम्यान 'बिग बॉस 17'मध्ये कॉमेडियन भारती सिंह पती हर्ष लिंबाचियासोबत शोच्या वीकेंड का वारमध्ये दिसणार आहे. या दोघांच्या एंट्रीमुळे शो आणखी रंगेल. याशिवाय ढिंचक पूजा शोमध्ये हजेरी लावणार आहे. 'बिग बॉस 11' मध्ये पूजा ही शोचा एक भाग होती. पूजा या शोमध्ये पाहुणी म्हणून दिसणार आहे. सध्या ढिंचक पूजाच्या प्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

हेही वाचा :

  1. 'नॅशनल क्रश' तृप्ती डिमरीला 'अ‍ॅनिमल'मधील 'भाभी 2'च्या भूमिकेसाठी मिळाली 'एवढी' फी
  2. अर्जुन कपूरला मलायकावरुन केलं जातं ट्रोल, अर्जुन म्हणाला, "ट्रोल करणारे सेल्फीसाठीही तळमळतात"
  3. 'कॉफी विथ करण सीझन 8'मध्ये आदित्य रॉय कपूरनं 'आशिकी 3'बद्दल दिली 'ही' प्रतिक्रिया
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.