ETV Bharat / entertainment

अरबाज - मलायकाचा मुलगा अरहान बॉलिवूडमध्ये एन्ट्रीसाठी सज्ज

author img

By

Published : Nov 8, 2022, 1:51 PM IST

माजी जोडपे अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान खान बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी सज्ज होत आहे. सध्या तो अमेरिकेत चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेत असून लवकरच वडीलाच्या चित्रपटाला मदत करण्यासाठी तो भारतात परतणार आहे. विशेष म्हणजे, युनायटेड स्टेट्समधील फिल्म स्कूलमध्ये परत जाण्यापूर्वी त्याने करण जोहरसोबत एक लहान इंटर्नशिप पूर्ण केली आहे.

Etv Bharat
अरबाज - मलायकाचा मुलगा अरहान बॉलिवूडमध्ये एन्ट्रीसाठी सज्ज

मुंबई - अभिनेता-निर्माता अरबाज खान आणि त्याची माजी पत्नी मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान खान बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या युनायटेड स्टेट्समध्ये चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेत असलेला अरहान लवकरच त्याच्या वडिलांसोबत त्याच्या पुढील निर्मिती उपक्रमात सामील होणार आहे.

अरबाजने त्याच्या मुलाच्या बॉलीवूडची स्वप्ने असल्याच्या चर्चांना पुष्टी दिली. खान्सच्या प्रतिष्ठित कुटुंबातून येत असल्याने, आश्चर्य वाटण्यासारखे यात काही नाही, परंतु अरबाजने आपल्या मुलाच्या बॉलीवूड आकांक्षांबद्दल उघड केलेला मनोरंजक तपशील म्हणजे करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी सेटवर अरहानने आधीच 20-30 दिवसांची इंटर्नशिप पूर्ण केली आहे.

एका वेबलॉइडशी बोलताना अरबाजने सांगितले की, अरहान चित्रपट निर्मितीची व्यावहारिक बाजू जाणून घेण्यास उत्सुक आहे. दबंग निर्मात्याने असेही सांगितले की त्याचा मुलगा पटना शुक्ला दिग्दर्शित त्याच्या आगामी चित्रपटात त्याला मदत करेल.

अरबाजने सांगितले की अरहान पुढच्या महिन्यात येणार असून तो पटना शुक्लासोबत त्याला चित्रपट निर्मितीची व्यावहारिक बाजू देखील शिकायची आहे. "खरं तर, या सेमिस्टरमध्ये जाण्यापूर्वी तो करणच्या चित्रपटातही होता. त्याने सहाय्यक (दिग्दर्शक) म्हणून जवळपास 20-30 दिवस सेटवर काम केले आहे. तो आता माझ्या चित्रपटात येण्याबद्दल उत्सुक आहे. आता, तो डिसेंबरमध्ये येणार आहे… माझ्या चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यात तो माझ्यासोबत सामील होईल,” असे ५५ वर्षीय अभिनेता अरबाज खान म्हणाला.

परदेशात अरहानच्या अभ्यासाविषयी बोलताना अरबाज म्हणाला, "माझा मुलगा सध्या लॉंग आयलँड फिल्म स्कूलमध्ये शिकत आहे, तो त्याच्या दुसऱ्या वर्षात, पहिल्या सेमिस्टरमध्ये आहे. तो तिथे त्याच्या वेळेचा खूप आनंद घेत आहे. मी थोडासा संशयी होतो आणि काळजी करत होता. कारण एकदम सुरक्षित वातावरणातून आल्यानंतर जेव्हा अचानक दूर जावे लागते तेव्हा काळजी वाटते. पण तो जे करत आहे ते त्याला आवडते आहे, तो मित्र बनवत आहे. तो आवडीचे मुक्तपणे शिकत आहे. त्यामुळे मला त्याचा खूप आनंद आणि अभिमान आहे."

19 वर्षांच्या लग्नानंतर, मलायका आणि अरबाज 2017 मध्ये विभक्त झाले. या जोडप्याने 2002 मध्ये अरहानचे स्वागत केले होते.

हेही वाचा - गायिका चेर हिचा 40 वर्षांनी लहान असलेल्या अलेक्झांडर एडवर्ड्ससोबत सुरू आहे रोमान्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.