ETV Bharat / entertainment

Angad Bedi dedicates gold medal : अंगद बेदीनं अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदक वडील बिशन सिंग बेदींना केलं समर्पित

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 7:32 PM IST

Angad Bedi dedicates gold medal
अंगद बेदीला अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदक

Angad Bedi dedicates gold medal : अभिनेता अंगद बेदीनं दुबईतील ओपन इंटरनॅशनल मास्टर्स 2023 अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नुकतचं सुवर्णपदक मिळालं. अलिकडेच त्याचे वडील आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं होतं. अंगदनं आपल्या मिळालेलं हे सुवर्णपदक वडीलांना समर्पित केलं आहे.

मुंबई - Angad Bedi dedicates gold medal : अभिनेता आणि दिवंगत क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचा मुलगा अंगद बेदीनं दुबईतील ओपन इंटरनॅशनल मास्टर्स 2023 अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नुकतचं सुवर्णपदक मिळालं. यावर अनेकांनी त्याचं अभिनंदन केल्याबद्दल त्यानं सर्वांचं आभार मानलं होतं. अलिकडेच त्याचे वडील आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. अंगदनं आपल्या मिळालेलं हे सुवर्णपदक वडीलांना समर्पित केलं आहे.

दुबईत पार पडलेल्या ओपन इंटरनॅशनल मास्टर्स 2023 अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये अंगद बेदीने 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळवले, ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. अंगदने त्याच्या इंस्टाग्रामवर धावण्याच्या शर्यतीतील फोटो आणि विजयाचे क्षण शेअर करून आपला विजय साजरा केला. एका पोस्टमध्ये, त्यानं वैयक्तिक सर्वोत्तम वेळ किंवा फॉर्म गाठला नसतानाही या सुवर्णपदकाचे प्रचंड महत्त्व कबूल केलं. अंगदने आपल्या वडिलांबद्दल मनापासून कौतुक व्यक्त करत लिहिले, 'हे गोल्ड नेहमीच माझ्यासाठी सर्वात खास असेल. माझ्यासोबत असल्याबद्दल धन्यवाद बाबा. मला तुमची आठवण येते.'

अंगदने त्याची पत्नी नेहा धुपिया आणि त्याचे प्रशिक्षक मिरांडा ब्रिन्स्टन यांचेही कृतज्ञता व्यक्त केली . या दोघांनी त्याला त्याच्या संपूर्ण प्रवासात अखंड सहकार्य आणि प्रोत्साहन दिलं. विशेषतः, त्यानं प्रशिक्षक मिरांडाचा चांगल्या आणि आव्हानात्मक अशा दोन्ही दिवसांमध्ये पाठीशी ठाम राहल्याचा उल्लेख केला. याशिवाय त्यानं आपल्या डॉक्टर प्राची शाहच्या प्रयत्नांचंही कौतुक केले आणि विनोदाने कबूल केलं. अंगदने आपली मुलं मेहरुन्निसा आणि गुरिक मोठी झाल्यावर त्यांच्यासोबत धावण्याची इच्छा व्यक्त केली आणि आपल्या आयुष्यात कुटुंबाच्या असलेल्या महत्त्वावर जोर दिला.

सुवर्णपदक जिंकल्यानंतर एका प्रेस स्टेटमेंटमध्ये, अंगदने त्याच्या वडिलांच्या शहाणपणाचा आणि मूल्यांचा खोल प्रभाव असल्याचं सांगितलं. वडीलांचा वारसा कायम राखण्यासाठी स्पर्धेत उतरल्याचंही त्यानं सांगितलं. अंगदने प्रशिक्षक मिरांडा यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, प्रशिक्षकाने त्याच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, असल्याचं सांगितलं. या विजयामुळे अंगदचे आंतरराष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धांमध्ये पदार्पण झालंय. अंगद बेदीसाठी एक उल्लेखनीय कामगिरी आहे. यापूर्वी, अंगद बेदीने वर्षाच्या सुरुवातीला मुंबईत झालेल्या स्प्रिंटिंग स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते.

हेही वाचा -

1. Ott Play Awards 2023: ओटीटी प्ले अवॉर्ड्सची झाली घोषणा; 'या' कलाकारांनी जिंकल सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीचा पुरस्कार...

2. Raj Kundra Ut 69 : दिल्लीच्या चांदणी चौकात राज कुंद्रानं केलं अनोख्या 'छंदा'चं प्रदर्शन

3. Mami Film Festival 2023 : मामी फिल्म फेस्टीव्हलमध्ये प्रियांका चोप्रानं भूमी पेडणेकरवर उधळली स्तुती सुमनं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.