ETV Bharat / entertainment

Allu Arjun cameo in Jawan : शाहरुखच्या जवान चित्रपटात झळकणार पुष्पा स्टार अल्लू अर्जुन?

author img

By

Published : Feb 13, 2023, 5:04 PM IST

शाहरुख खान त्याच्या आगामी जवान या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये गुंतला आहे. जवानची स्टार कास्ट आणि क्रूमध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज नावांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीमध्ये आता पुष्पा स्टार अल्लू अर्जुनचाही समावेश होणार असल्याची चर्चा आहे.

Allu Arjun cameo in Jawan
Allu Arjun cameo in Jawan

मुंबई - पठाण चित्रपटाच्या प्रचंड यशाचा आनंद घेत असलेला बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आता त्याच्या आगामी 'जवान' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये गुंतला आहे. जवानची स्टार कास्ट आणि क्रूमध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज नावांचा समावेश करण्यात आला आहे. बॉलिवूड आणि दक्षिणेकडील चित्रपट उद्योग यांच्यातील सर्वात मोठे टॅलेंट क्रॉसओव्हर दर्शविणारा हा चित्रपट दक्षिणेकडील आणखी एका ए-लिस्टर स्टारकास्टला समावून घेणार आहे.

साऊथ आणि बॉलिवूड स्टार्स एकत्र - एटली कुमार दिग्दर्शित जवान या पॅन इंडिया चित्रपटात तमिळ सुपरस्टार विजय सेतुपती आणि नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विजय चित्रपटात शाहरुख खानसोबत जबरदस्त लढाई करताना दिसणार आहे, तर नयनतारा एका तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. शाहरुखच्या चाहत्यांना दुहेरी लाभ होईल कारण किंग खान जवान चित्रपटात दुहेरी भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहे.

साऊथमध्ये यश मिळवण्यासाठी किंग खानचा नवा प्रयोग - आधीच पॉवरफुल भरलेल्या चित्रपटात आणखी स्टार पॉवर जोडणे हे अल्लू अर्जुनशिवाय दुसरे कोणीही असू शकत नाही. लेटेस्ट वृत्तांनुसार, एटलीने जवानमध्ये कॅमिओ करण्यासाठी पुष्पा स्टार अल्लूशी संपर्क साधला आहे. अल्लू अर्जुनची जवानमधील भूमिका छोटी पण महत्त्वाची असल्याचं म्हटलं जात आहे. असे जर घडले तर बॉलिवूड आणि दक्षिणेकडील सर्वोत्कृष्ट कलाकार एकत्र येणे हे मनोरंजक असेल.अल्लू अर्जुन हा आता देशभऱ पुष्पा चित्रपटामुळे परिचीत झाला असला तरी तो दाक्षिणात्या चित्रपटातून गेली २ दशके काम करतोय. त्याचे आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडूसह संपूर्ण साऊथ इंडियामध्ये कट्टर फॅन्सची फौज आहे. आजवर साऊमध्ये बॉलिवूड चित्रपट फार पाहिले जात नाहीत हा अनुभव आहे. यापूर्वीही साऊथ कलाकार बॉलिवूडमध्ये घेऊन प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला आहे. पण म्हणावे तसे यश अद्याप मिळालेले नाही. यापार्श्वभूमीवर दक्षिणेतील दिग्दर्शक व तगडे स्ट्र्ससह बॉलिवूडचा किंग खान चित्रपट बनवतो. या निश्चीतच यशस्वी प्रयोग ठरु शखतो.

दरम्यान, जवानमध्ये फॅमिली मॅन फेम प्रियामणी आणि सान्या मल्होत्रा ​​देखील प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट हाईस्ट थ्रिलर आहे आणि शाहरुख खान यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. या चित्रपटाविषयी बोलताना एटली एकदा म्हणाले होते, मला प्रेक्षकांना एक अपवादात्मक अनुभव द्यायचा आहे, जो यापूर्वी त्यांनी पाहिलेला नसेल. शिवाय शाहरुखही यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसेल.

शाहरुख खानची रेड चिलीज या प्रॉडक्शन कंपनीने जवानची निर्मिती केली आहे. संपूर्ण भारताभर हा चित्रपट 2 जून 2023 रोजी हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होईल. जवानच्या पाठोपाठ एसआरकेकडे राज कुमार हिरानी यांचा डंकी हा चित्रपटही आहे. या चित्रपटात तापसी पन्नू देखील मुख्य भूमिकेत आहे.

हेही वाचा - Salman And Pooja Hegdes Hemistry : नैयो लगदा गाण्यातून दिसली सलमान खान आणि पूजा हेगडेची परफेक्ट केमेस्ट्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.