ETV Bharat / entertainment

Selfiee song kudiye ni teri released : सेल्फीतील कुडिये नी तेरी गाणे रिलीज, अक्षय कुमार आणि मृणाल ठाकूरची जबरदस्त केमेस्ट्री

author img

By

Published : Feb 9, 2023, 5:48 PM IST

सीता रामम फेम अभिनेत्री मृणाल ठाकूर अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांच्या आगामी 'सेल्फी' चित्रपटात जबरदस्त लूकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटातील गाणे कुडिये नी तेरी रिलीज झाले आहे.

Selfiee song kudiye ni teri released
Selfiee song kudiye ni teri released

मुंबई - सीता रामम या गाजलेल्या चित्रपटानंतर, दक्षिण चित्रपटसृष्टीतील चमकदार अभिनेत्री मृणाल ठाकूर आता अक्षय कुमार, इमरान हाश्मी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या सेल्फी चित्रपटामध्ये तिच्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटात अभिनेत्री मृणाल शानदार स्टाईलमध्ये दिसणार आहे, ज्याची झलक समोर आली आहे. ड्रायव्हिंग लायसन्स या मल्याळम चित्रपटाचा रिमेक असलेल्या सेल्फी चित्रपटामध्ये अभिनेत्री मृणालची ग्लॅमरस झलक पाहिल्यानंतर चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत. कुडिये नी तेरी या गाण्यात अक्षयसोबत मृणाल अप्रतिम स्टाईलमध्ये दिसत आहे.

कुडिये नी तेरी वाइबमध्‍ये मृणालचा मस्त लूक - या चित्रपटाचे गाणे आऊट झाले आहे, ज्याचे शीर्षक कुडिए नी तेरी वाइब असे असून हा एक डान्स नंबर आहे. गाण्यात मृणाल ठाकूर अनेक जबरदस्त आणि हॉट स्टाइलमध्ये दिसत आहे. मृणाल ठाकूरने इंस्टाग्राम अकाऊंटवर गाण्याचा टीझर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, व्हेरिफाईड कुडीये नी तेरीवर डान्स करा आणि एकत्र उत्साह अनुभवा! आता पूर्ण गाणे रिलीज झाले आहे. गाण्यात मृणाल आणि अक्षय दोघेही अनेकवेळा दिसलेल्या स्टाईलमध्ये दिसत आहेत.

हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी स्टारर 'सेल्फी' चित्रपटचा ट्रेलर चित्रपट निर्मात्यांनी 22 जानेवारी रोजी रिलीज केला आहे. राज मेहता दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री डायना पेंटी आणि नुसरत भरुचा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. एका अनोख्या कथेसह आणि अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांच्या आकर्षक नवीन ऑनस्क्रीन जोडीसह, हा चित्रपट यावर्षी 24 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

सुपरस्टार आणि सुपरफॅनचा सेल्फी - सेल्फी ट्रेलरमध्ये पाहिल्याप्रमाणे, चित्रपट एका सुपरस्टार (अक्षय कुमार) भोवती फिरतो, जो त्याच्या ऑनस्क्रीन व्यक्तिमत्त्वासाठी आणि ड्रायव्हिंगच्या प्रेमासाठी प्रसिद्ध आहे. जेव्हा तो त्याचा परवाना गमावतो तेव्हा हे सर्व सुरू होते. एका मोटर इन्स्पेक्टरशी (इमरान हाश्मी) भांडण झाल्यावर कथेत यू-टर्न घेतला जातो, हा इन्स्पेक्टर अभिनेत्याचा चाहता असतो. सेल्फी हा मल्याळम चित्रपट ड्रायव्हिंग लायसन्सचा अधिकृत हिंदी रीमेक आहे, ज्यात पृथ्वीराज आणि सूरज वेंजारामूडू यांच्या भूमिका आहेत. मूळ मल्याळम चित्रपटाचे दिग्दर्शन लाल ज्युनियर यांनी साचीच्या पटकथेवरून केले होते. साऊथमध्ये गाजलेल्या अनेक कथा आता पॅन इंडिया चित्रपटातून दिसत असताना अनेक चित्रपट रिमेकही होत आहेत. अलिकडे रिलीज झालेला दृष्यम हे त्याचे उत्तम उदाहरण होते. दृष्यम असेल किंवा कबीर सिंग दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी रिमेकनी बॉक्स ऑफिसवर नेहमी धुमाकुळ घातला आहे.

हेही वाचा - Biopic On Ravindra Kaushik : भारतीय गुप्तहेर रवींद्र कौशिक यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन करणार अनुराग बसू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.