ETV Bharat / entertainment

ऐश्वर्या रायची बच्चनची मुलगी आराध्यानं शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात दिला जबरदस्त परफॉर्मन्स

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 16, 2023, 12:21 PM IST

Aaradhya Bachchan viral Video : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चननं तिच्या शाळेतील कार्यक्रमात जबरदस्त परफॉर्म केलं. आता तिचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Aaradhya Bachchan viral Video
आराध्या बच्चनचा व्हायरल व्हिडिओ

मुंबई - Aaradhya Bachchan viral Video : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची लाडकी मुलगी आराध्या बच्चन सध्या चर्चेत आली आहे. आराध्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती शाळेच्या कार्यक्रमात स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे. विशिष्ट केशरचना आणि मेकअपमुळे ती अगदी वेगळी दिसतेय. दरम्यान आता अनेकजण आराध्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर कमेंट करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. काल संध्याकाळी आराध्या बच्चनच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आराध्या बच्चननं लक्ष वेधून घेतलं : धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या अनेक स्टार्सच्या मुलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. ऐश आणि अभिषेकची मुलगी आराध्या बच्चनही तिच्या शाळेच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. स्टेजवर परफॉर्म करताना आराध्या एका हटके लूकमध्ये दिसली. आराध्यानं जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता आणि विशेष म्हणजे आराध्याची हेअरस्टाइल पूर्णपणे बदलली होती. तिचे केस एरवी सार्वजनिक कार्यक्रमात दिसतात तसे कपाळावर नसून मागच्या बाजूला बांधलेले होते. आराध्याचा संपूर्ण चेहरा स्पष्टपणे दिसत होता. नव्या लूकमध्ये ती खूप खास दिसत होती. या कार्यक्रमात ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी उपस्थिती नोंदवली. ऐश्वर्या-अभिषेक यांच्यात वादाच्या बातम्या रंगत असताना या दांपत्याची एकत्र उपस्थिती लक्ष वेधून गेली.

पहिल्यांदाच आराध्या बच्चनचा पूर्ण चेहरा दिसला : आराध्याच्या शाळेतील परफॉर्मन्सच्या व्हिडिओवर कमेंट करत एका यूजरनं लिहिलं, "शेवटी आम्हाला आराध्याचे कपाळ पाहायला मिळाले." दुसऱ्या एकानं लिहिलं, ''शेवटी तिचे कपाळ दिसत आहे, ती खूप छान परफॉर्म करत आहे''. आणखी एकानं लिहिलं, ''आराध्याच्या हेअरस्टाइलला पुरस्कार द्याला पाहिजे, कारण आज सर्वांना तिचं कपाळ पाहायला मिळालं''. याशिवाय काहीजणांनी या व्हि़डिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट केल्या आहेत. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक दिवस सेलिब्रेशनसाठी अनेक कलाकार उपस्थित होते. सध्या या कार्यक्रमाची प्रचंड चर्चा होत आहे.

हेही वाचा :

  1. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला परदेशात जाण्यात अडथळा कायम, दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार
  2. 'तुझसे नाराज नहीं जिंदगी' फेम गायक अनूप घोषाल यांचं निधन, ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  3. अभिषेक-ऐश्वर्या विभक्त झाले? या व्हिडिओतून खरं काय ते उघडकीस
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.