ETV Bharat / entertainment

'Ponniyin Selvan-Part 2 : हैदराबादच्या इव्हेंटमध्ये ऐश्वर्या राय बच्चनचा ग्लॅमरस लूक; आकर्षक सौंदर्याने वेधले सर्वांचे लक्ष

author img

By

Published : Apr 24, 2023, 10:50 AM IST

'PS-1' चा सीक्वल 'पोनियिन सेल्वन-पार्ट' रिलीजसाठी सज्ज आहे. यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन पडद्यावर दिसणार आहे. ऐश्वर्याच्या लूकचे खूप कौतुक केले जात आहे.

'Ponniyin Selvan-Part 2
ऐश्वर्या राय बच्चनचा ग्लॅमरस लूक

हैदराबाद : ऐश्वर्या राय बच्चन सध्या तिच्या 'पोनियिन सेल्वन 2' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच अभिनेत्रीने हैद्राबाद येथे एका खास कार्यक्रमात तिच्या जबरदस्त आकर्षक सौंदर्यांने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लाल रंगाच्या एथनिक सूटमध्ये ऐश्वर्या नेहमीप्रमाणेच शाही दिसत होती. तिचा सूट पूर्णपणे सोनेरी खड्यांनी सजलेला होता. यादरम्यान तिने लाइट मेकअप केला होता. केस खुले ठेवले. एक लहान गोल बिंदी तिच्या लुकमध्ये नक्कीच भर घालते आहे. तिने कानात मोठे झुमकेही घातले होते.

टीमवर प्रेमाचा वर्षाव : कार्यक्रमात ऐश्वर्याने 'पोनियिन सेल्वन'च्या टीमवर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले. यादरम्यान ती म्हणाली की 'तुमच्या समर्थन आणि कौतुकाबद्दल धन्यवाद. तुम्ही आमच्या चित्रपटाला दिलेला अतुलनीय प्रतिसाद, आम्हाला खरोखरच खूप प्रिय आहे. 28 एप्रिल रोजी 'PS-2' पाहण्यासाठी तुमच्यापैकी कोणी उत्सुक आहात. तुमचे खूप खूप आभा.र पण प्रथम मी माझ्या मणि गरूचे आभार मानू इच्छिते.

कादंबरीचे सिनेमॅटिक रूपांतर : 'पोनियिन सेल्वन - पार्ट 2' मध्ये ऐश्वर्या तिच्या भूमिकेची पुनरावृत्ती करताना दिसणार आहे. 'PS-1' लेखक कल्की कृष्णमूर्ती हे आहेत. यांच्या त्याच नावाच्या तमिळ कादंबरीचे हे सिनेमॅटिक रूपांतर होते. 1950च्या दशकात जी मालिका म्हणून प्रसिद्ध झाली होती. 2010 मध्ये आलेल्या 'रावण' या समीक्षकांनी गाजलेल्या चित्रपटानंतर दक्षिण अभिनेता विक्रमसोबत ऐश्वर्याचा हा तिसरा सहयोग आहे. याचा दुसरा भाग 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

फ्लॅशबॅक कथेवर लक्ष केंद्रित : चित्रपट निर्माते मणिरत्नम यांनी पहिल्या आणि दुसऱ्या भागाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट अरुलमोझी वर्मन आणि चोल साम्राज्याचा महान शासक राजा चोल पहिला बनण्याच्या त्याच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करत राहील. दुसऱ्या भागात विक्रम उर्फ ​​आदित्य करिकलनच्या फ्लॅशबॅक कथेवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे. या सीक्वलमध्ये ऐश्वर्याने साकारलेली पोनियिन सेल्वन आणि ओमाई राणी यांच्यातील नातेही दाखवले जाईल.

हेही वाचा : Amitabh Bachchan Tweet On Blue Tick : ए ट्विटर खेल खतम, पैसे हजम.. बिग बींनी पुन्हा घेतली ट्विटरची फिरकी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.