ETV Bharat / entertainment

Gumraah trailer out now : आदित्य रॉय कपूर आणि मृणाल ठाकूर यांच्या गुमराहचा ट्रेलर रिलीज

author img

By

Published : Mar 23, 2023, 6:51 PM IST

गुमराह या आगामी चित्रपटाचा ट्रेलर आता प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या थडम या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. वर्धन केतकर दिग्दर्शित, गुमराहमध्ये आदित्य रॉय कपूर आणि मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहेत.

Etv Bharat
गुमराहचा ट्रेलर रिलीज

मुंबई - आदित्य रॉय कपूर आणि मृणाल ठाकूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या वर्धन केतकरच्या गुमराहचा ट्रेलर गुरुवारी दुपारी प्रदर्शित झाला. आगामी मर्डर मिस्ट्री हा हिंदी चित्रपट 2019 च्या तमिळ क्राईम ड्रामा थडमचा रिमेक आहे. मूळ चित्रपटामध्ये अरुण विजय आणि विद्या प्रदीप यांची भूमिका आहे. गुमराहमध्ये आदित्यने दोन व्यक्तिरेखा साकारल्या आहेत जो खुनाच्या तपासात समान संशयित आहे.

ट्रेलरची सुरुवात एका भयानक खुनाच्या दृश्याने होते. मारेकऱ्याची ओळख पटलेली नाही, मात्र त्याने पिवळा रेनकोट घातलेला दिसतो. व्हिडिओतील मुख्य फोकस नंतर अधिकारी शिवानी माथूर (मृणाल ठाकूर) यांच्याकडे शिफ्ट केला जातो की खून सुनियोजित होता आणि संशयित एक अत्यंत हुशार गुन्हेगार आहे. व्हिडिओ नंतर आदित्य रॉय कपूरच्या जवळजवळ परिपूर्ण जीवनाच्या एका मॉन्टेजमध्ये बदलतो. मृणाल ठाकूर आणि तिचा बॉस रोनित रॉय यांना खऱ्या गुन्हेगाराचा शोध घेणे सोपे नाही, परंतु सत्य उघड करण्याचा त्यांचा निर्धार ट्रेलरमध्ये दिसत आहे.

इंस्टाग्रामवर मृणाल ठाकूरने चित्रपटाचा ट्रेलर एका कॅप्शनसह शेअर केला, 'हर कहानी के दो पेहलू होते हैं, सच और झूठ, लेकीन इस कहानी के पेहलू हैं गुनाह और गुमराह! गुमराह ट्रेलर आऊट नाऊ!.' अभिनेत्री मृणालने मीडियाला सांगितले की तिच्या आगामी 'गुमराह' चित्रपटात पोलिसाची भूमिका करणे आव्हानात्मक होते, ही भूमिका तिने जबाबदारीने हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रेलरमधून गुमराह चित्रपटाबद्दलची फत्सुकता नक्कीच वाढीस लागलेली दिसते. चित्रपटातील कथानकाचा वेगही या ट्रेलरमध्ये दिसून येतो.

आदित्य रॉय कपूरने त्याच कॅप्शनसह हीच पोस्ट आपल्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केली आहे. त्याने ट्रेलर पोस्ट करताच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी कमेंट विभागात गर्दी केली. एका युजरने लिहिले, ब्लॉकबस्टर होणार आहे दुसर्‍याने लिहिले,'दोन्ही भूमिकांमध्ये तुमचा अभिनय, अभिव्यक्ती, पडद्यावरची उपस्थिती सर्व काही उत्कृष्ट आहे... दोन भूमिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय करणारा एक व्यक्ती ... ऑल द बेस्ट आदि...'

हेही वाचा - Irfan Pathan's Son Dance : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने छोट्या पठाणच्या डान्सवर दिली प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.