ETV Bharat / entertainment

75 वी एमी पुरस्कार विजेत्यांची यादी: द बेअर, सक्सेशन आणि बीफला सर्वाधिक पुरस्कार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 16, 2024, 2:34 PM IST

75th Emmys full winners list: लॉस एंजेलिसमधील पीकॉक थिएटरमध्ये आयोजित 75 व्या एमी पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वात मोठे यश द बीअर, सॅक्सेशन आणि बीफ या सिरीजने मिळवले. संपूर्ण विजेत्यांची यादी पाहण्यासाठी पुढे वाचा.

75th Emmys full winners list
75 वी एमी पुरस्कार विजेत्यांची यादी

75th Emmys full winners list: लॉस एंजेलिस (यूएस)- लॉस एंजेलिसमधील पीकॉक थिएटरमध्ये झालेल्या 75 व्या एमी पुरस्कार सोहळ्यामध्ये बिअर, सॅक्सेशन आणि बीफ सिरीजना सर्वाधिक यश संपादन करता आले. हा पुरस्कार सोहळ्या पूर्वी ठरल्या प्रमाणे 2023 च्या सप्टेबर महिन्यात पार पडणार होता. परंतु हॉलिवूडमध्ये झालेल्या मोठ्या संपामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. सक्सेशन आणि द बीअर या सिरीजने प्रत्येकी सहा विजयांसह आघाडी घेतली आणि बीफ मालिकेने पाच पुरस्कार पटकावले.

विजेत्यांची संपूर्ण यादी पहा:

ड्रामा सिरीज - सक्सेशन

कॉमेडी सिरीज - द बेअर

लिमिटेड किंवा अँथालॉजी सिरीज- बीफ

ड्रामा सिरीजमधील मुख्य अभिनेता- किरन कल्किन, सक्सेशन

ड्रामा सिरीजमधील मुख्य अभिनेत्री- सारा स्नूक, सक्सेशन

कॉमेडी सिरीजमधील मुख्य अभिनेता- जेरेमी अॅलन व्हाईट, द बेअर

लिमिटेड किंवा अँथालॉजी सिरीज किंवा चित्रपटातील प्रमुख अभिनेता- स्टीव्हन य्युन, बीफ

लिमिटेड किंवा अँथालॉजी सिरीज मुख्य अभिनेत्री- क्विंटा ब्रन्सन, अॅबॉट एलिमेंटरी

लिमिटेड किंवा अँथालॉजी सिरीज लीड अभिनेत्री- अली वोंग, बीफ

ड्रामा सिरीजमधील सहाय्यक अभिनेता- मॅथ्यू मॅकफॅडियन, सक्सेशन

ड्रामा सिरीजमधील सहाय्यक अभिनेत्री- जेनिफर कूलिज, द व्हाईट लोटस

कॉमेडी सिरीजमधील सहाय्यक अभिनेता- एबोन मॉस-बक्रॅच, द बीअर

कॉमेडी सिरीजमधील सहाय्यक अभिनेत्री- अयो एडेबिरी, द बेअर

लिमिटेड किंवा अँथालॉजी सिरीज किंवा चित्रपटातील सहाय्यक अभिनेता- पॉल वॉल्टर हॉसर, ब्लॅक बर्ड

लिमिटेड किंवा अँथालॉजी सिरीज किंवा चित्रपटातील सहाय्यक अभिनेत्री- नीसी नॅश-बेट्स, डहमर -- मॉन्स्टर: द जेफ्री डॅमर स्टोरी

स्क्रिप्टेड व्हरायटी सिरीज - लास्ट वीक टूनाईट विथ जॉन ऑलिव्हर

टॉक सिरीज - डेली शो विथ ट्रेव्हर नोहा

रिआलिटी कॉम्पिटेशन शो रुपाउल्स ड्रॅग रेस

व्हरायटी स्पेशल (लाइव्ह)- एल्टन जॉन लाइव्ह: फेअरवेल फ्रॉम डॉजर स्टेडियम

ड्रामा सिरीजसाठी दिग्दर्शन - मार्क मायलॉड, सक्सेशन (कॉनॉर्स वेडिंग)

कॉमेडी सिरीजसाठी दिग्दर्शन - क्रिस्टोफर स्टोरर, द बेअर ('रिव्ह्यू')

लिमिटेड किंवा अँथालॉजी सिरीज किंवा चित्रपटाचे दिग्दर्शन- ली सुंग जिन, बीफ (फिगर्स ऑफ लाईट)

ड्रामा सिरीजसाठी लेखन- जेसी आर्मस्ट्राँग, सक्सेशन (कॉनॉर्स वेडिंग)

कॉमेडी सिरीजसाठी लेखन- क्रिस्टोफर स्टोरर, द बेअर (सिस्टम)

लिमिटेड किंवा अँथालॉजी सिरीज किंवा चित्रपटासाठी लेखन- ली सुंग जिन, बीफ ( द बर्ड्स डोन्ट सिंग, दे स्क्रिच इन पेन )

व्हरायटी सिरीजसाठी लेखन - लास्ट वीक टूनाईट विथ जॉन ऑलिव्हर

हेही वाचा -

  1. महेश बाबूनं चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत केलं 'गुंटूर कारम'च्या यशाचे सेलिब्रेशन
  2. 75 व्या एमी पुरस्कार सोहळ्यात दिवंगत मॅथ्यू पेरीचा 'फ्रेंड्स थीम सॉन्ग'ने सन्मान
  3. 'रंगनिर्मितीचे बादशाह' सदानंद कुंदर 'जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.