ETV Bharat / crime

Attempt to abduct a young woman : नाशिकमध्ये तरुणीचा पाठलाग करून अपहरणाचा प्रयत्न; दोघे पोलिसांच्या ताब्यात

author img

By

Published : Jan 10, 2022, 9:01 PM IST

Updated : Jan 10, 2022, 10:12 PM IST

तरुणीचा ओरडण्याचा आवाज ऐकून तिच्या काकांनी धाव घेत गुंडांच्या तावडीतून ( uncle saved nephew from abduction in Nashik ) तिची सुटका केली. त्यानंतर पीडित मुलीच्या काकांनी एका संशयित गुंडाला आवळून पकडून ठेवले. दोघांना पंचवटी पाेलिसांनी अटक केली ( Panchwati arrest two youth in kidnap case ) आहे.

अटकेतील आरोपीसह पोलीस
अटकेतील आरोपीसह पोलीस

नाशिक - २१ वर्षीय तरुणीचा दुचाकीने पाठलाग करुन तिचा बळजबरीने हात धरत अपहरण करण्याचा ( attempt of kidnap young lady in Nashik ) प्रयत्न केल्याची घटना पंचवटीतील पेठफाट्यावर रविवारी रात्री घडली. पण, पायी जाणाऱ्या या तरुणीने आरडाओरड केल्याने या दोन तरुणांचा अपहरण करण्याचा डाव फसला. दाेघांना पंचवटी पाेलिसांनी अटक केली ( Panchwati arrest two youth in kidnap case ) आहे.

तरुणीचा ओरडण्याचा आवाज ऐकून तिच्या काकांनी धाव घेत गुंडांच्या तावडीतून तिची सुटका केली. त्यानंतर पीडित मुलीच्या काकांनी एका संशयित गुंडाला आवळून पकडून ठेवले. अटकेतील आरोपींवर जुगार खेळल्याचे गुन्हे ( Nashik crime ) दाखल आहेत. राम दगू सांगळे (28, रा. अक्षरधाम अपार्टमेंट, रुम नं. 13 पेठफाटा पंचवटी नाशिक) व रोहीत एकनाथ मल्ले (24 वर्षे रा. रूम नं 4615, जाजूवाडी, इंद्रकुंड, पंचवटी) अशी अटक केलेल्या दाेघांची नावे आहेत.

साथीदाराची माहिती घेत त्यालाही अटक केली

हेही वाचा-स्पा सेंटरमध्ये तरुणीशी अश्लील चाळे, पुण्यातील डेक्कन परिसरातील धक्कादायक घटना

काय घडली घटना?

रविवारी रात्री पंचवटीतील पेठ फाटा येथील बालाजी हॉटेलसमाेरुन हनुमानवाडी परिसरात राहणारी तरुणी पायी जात होती. राम सांगळे व ललित मल्ले यांनी दुचाकीवरून येत तरुणीचा पाठलाग केला. त्यावेळी त्यांनी पीडित तरुणीला काहीतरी उद्देशून इशारे केले. मात्र, तिने दुर्लक्ष करून पायी चालणे सुरूच ठेवले. त्यातील एका संशयिताने तिचा हात पकडून ओढत दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड केली असता तिच्या काकांनी तत्काळ तिच्या दिशेने धाव घेतली. झटापट करत छेड काढणाऱ्या दोघांना पकडले. त्यांच्या तावडीतून तरुणीला सोडविले. त्यावेळी आरोपींनी तिच्या काकांना शिवीगाळ केली. 'पोलिस ठाण्यात घेऊन गेले तर बघून घेऊ' असा दम भरला. त्यानंतर पीडित मुलीच्या काकांनी एका संशयिताला पकडून ठेवले. तर दुसरा पळून जाण्यास यशस्वी झाला. मात्र, पकडून ठेवलेल्या संशयिताला पंचवटी पाेलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. त्याच्याकडून साथीदाराची माहिती घेत त्यालाही अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक युवराज पंतकी ( PI Yuvraj Patanki on Nashik crime ) यांनी दिली.

हेही वाचा-Stealing Tap from Railway Bogie : रेल्वेच्या स्वच्छतागृहातील नळाच्या तोट्या चोरणारा अटकेत

चेन स्नॅचिंग, विनयभंगसारख्या घटनानंतर अपहरणाच्या घटनेने महिलांमध्ये भीती
पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. वाढत्या अपहरण, चेन स्नॅचिंग, विनयभंगाच्या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यात आणखी अपहरणाची घटना घडल्याने शहरातील महिलांमध्ये भीती पसरली आहे. पंचवटी पोलीस स्टेशनजवळ घडलेल्या या घटनेने शहरात मुली कितपत सुरक्षित आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे नाशिक पोलिसांनी हेल्मेट सक्तीविरुद्ध चांगलीच मोहीम राबविली आहे. दुसरीकडे शहरात सर्रास गुन्हे घडत आहेत. यावर वचक निर्माण करण्याऐवजी पोलीस हेल्मेट सक्तीला प्राधान्य देत असल्याचे दिसून असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.

हेही वाचा-Bully Bai App Case : बुली बाई ॲप प्रकरणातील दोघांना 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

Last Updated : Jan 10, 2022, 10:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.