ETV Bharat / city

Effective remedies for open urination : उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांचा पुष्पहार घालून सत्कार; नवीन उपाय प्रभावी

author img

By

Published : May 28, 2022, 7:50 PM IST

रस्त्यावरून जाणारे लोक हे नागरिक कुठल्यातरी वस्तीच्या बाजूला किंवा रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत उघड्यावर लघुशंका ( Open urination ) करतात. काही ठिकाणी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून लोक लघुशंका ( Open urination is the problem ) करून निघून जातात. यावर उपाय म्हणून समाजसेवक संगम डोंगरेंनी गांधीगिरीने यावर उपाय योजिला आहे.

Sangam Dongre Social Worker
संगम डोंगरे समाजसेवक

ठाणे : रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी सुलभ शौचालयाचा अभाव ( Lack of accessible toilets ) असल्याने रस्त्यावरून जाणारे लोक हे नागरिक कुठल्यातरी वस्तीच्या बाजूला किंवा रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत उघड्यावर लघुशंका करतात. काही ठिकाणी लावलेल्या बोर्डाकडे दुर्लक्ष करतात, तर काही ठिकाणी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून लोक लघुशंका करून निघून जातात. याचा त्रास आसपासच्या परिसरात राहणाऱ्या सर्वसामान्य रहिवाशांना सहन ( Open urination bothers locals ) करावा लागतो. लघुशंका करणाऱ्या लोकांना आवर घालण्यासाठी ठाण्यातील समाजसेवक संगम डोंगरे यांनी पुढाकार घेऊन गांधीगिरीचा नवा फंडा सुरू केला आहे. या गांधीगिरीमध्ये डोंगरे ( Social worker Sangam Dongre ) यांनी उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांचा चक्क पुष्पहार घालून सत्कार केला आहे.

रस्त्यावर लघुशंका करणाऱ्यांना पुष्पहार : रस्त्यात मोकळी जागा बघितली की, लगेच दिवसाढवळ्या उघड्यावर लघुशंका करून निघणाऱ्या नागरिकांनो सावधान... उघड्यावर कुठेही लघुशंका करताना आढळून आल्यास तुमचा पुष्पहार घालून सत्कार होण्याची शक्यता आता वाढलेली आहे. येथे लघुशंका करू नका, असा बोर्ड पाहिल्यानंतरही आसपास वस्ती, लोकांची रहदारी असतानाही लघुशंका करणाऱ्यांना विरोध करण्याची अभिनव शक्कल समाजसेवक संगम डोंगरे या तरुणाने सुरू केली आहे. लघुशंका करणाऱ्या लोकांवर पाळत ठेवून लघुशंका करताना दिसल्यास त्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यास सुरुवात केली आहे. या कार्यप्रणालीने लघुशंका करणाऱ्याच्या विरोधात गांधीगिरीचे हे शस्त्र प्रभावी ठरत आहे. दरम्यान, वर्दळीच्या आणि रस्त्यावर सुलभ शौचालये निर्माण होणे गरजेचे आहे. अशा मोकळ्या जागेवर उद्यान करून सुलभ शौचालयाची उभारणी करण्यात यावी जेणे करून नागरिकांना लघुशंकेसारख्या अत्यावश्यक गोष्टीसाठी शौचालयाचा शोध घ्यावा लागणार नाही, तसेच उघड्यावर लघुशंका करावी लागणार नाही, अशा भावना समाजसेवक संगम डोंगरे आणि स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

रेल्वे स्थानक परिसर असल्याने मोठी गर्दी : हा परिसर ठाणे रेल्वे स्थानकाच्या जवळ असल्यामुळे या परिसरात उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे स्थानिकांना ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना विशेष करून या समस्येचा मोठा त्रास होत आहे. या परिसरात दुर्गंधीदेखील वाढत असल्यामुळे नागरिकांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला आहे.


हेही वाचा : Pay Treatment Cost of Victims : शालेय विद्यार्थ्यांना शिकवून समाजसेवा करा- रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्यायालयाचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.