ETV Bharat / bharat

Pay Treatment Cost of Victims : शालेय विद्यार्थ्यांना शिकवून समाजसेवा करा- रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्यायालयाचे आदेश

author img

By

Published : May 28, 2022, 7:33 PM IST

न्यायमूर्ती मौसमी भट्टाचार्य ( Justice Moushumi Bhattacharya  ) यांनी चुकीच्या विद्यार्थ्यांना फटकारत म्हटले, की शैक्षणिक संस्थेत हिंसाचार आणि तोडफोडीच्या कृत्यांसाठी ( vandalism in an academic institution ) कोणतेही कारण असू शकत नाही. विद्यापीठाच्या अँटी रॅगिंग समितीने ( Anti Ragging Committee probe ) प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सीसीटीव्ही फुटेज आणि तपशीलवार तपासाच्या आधारे बेदखल करण्याचे आदेश जारी केले होते.

कलकत्ता उच्च न्यायालय
कलकत्ता उच्च न्यायालय

कोलकाता- कलकत्ता उच्च न्यायालयाने विद्यापीठात रॅगिंगमध्ये सहभागी असलेल्यांना अत्यंत वेगळी ( Calcutta High Court on ragging case ) शिक्षा दिली आहे. रॅगिंग सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांना शिकवावे व सार्वजनिक सेवेत सहभागी व्हावे, असे न्यायालयाने आदेश दिले ( community service by teaching ) आहेत. तसेच पीडित विद्यार्थ्यांच्या उपचारांचा खर्च उचलण्यास सांगितले आहे.

विद्यापीठाच्या अँटी रॅगिंग समितीने ( Anti Ragging Committee probe ) प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सीसीटीव्ही फुटेज आणि तपशीलवार तपासाच्या आधारे बेदखल करण्याचे आदेश जारी केले होते. त्यावर काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. विद्यापीठाने 22 फेब्रुवारी 2022 च्या विद्यार्थ्यांच्या हकालपट्टीच्या नोटीसला स्थगिती द्यावी आणि बी. टेकच्या आठव्या सत्राच्या परीक्षेला ताबडतोब बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी याचिकेद्वारे केली आहे.

न्यायालयाने फटकारले-त्यावर न्यायमूर्ती मौसमी भट्टाचार्य ( Justice Moushumi Bhattacharya ) यांनी चुकीच्या विद्यार्थ्यांना फटकारत म्हटले, की शैक्षणिक संस्थेत हिंसाचार आणि तोडफोडीच्या कृत्यांसाठी ( vandalism in an academic institution ) कोणतेही कारण असू शकत नाही.

हॉस्पिटलायझेशन फी भरा-रॅगिंगला आळा घालण्यासाठी काही उपाययोजना केल्या पाहिजेत. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी, असे न्यायालयाने मत व्यक्त केले. काही जखमी विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी विद्यापीठाचे हॉस्पिटलायझेशन फी भरण्यास उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सांगितले आहे.

हेही वाचा-Dead Bodies Of 3 Sisters in well : तीन सख्ख्या बहिणींसह दोन मुलांचे विहिरीत आढळले मृतदेह, छळ झाल्याने आत्महत्येचा संशय

हेही वाचा-Fake dialysis bills : मयत रुग्णाच्या नावावर वर्षभरापासून बनावट बिले; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

हेही वाचा-Two militants killed : अनंतनागमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार, सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.