ETV Bharat / bharat

Dead Bodies Of 3 Sisters in well : तीन सख्ख्या बहिणींसह दोन मुलांचे विहिरीत आढळले मृतदेह, छळ झाल्याने आत्महत्येचा संशय

author img

By

Published : May 28, 2022, 5:09 PM IST

25 मे रोजी दुपारी दोन मुलांना घेऊन बहिणी घराबाहेर पडल्या ( Dead Bodies Of 3 Sisters ) होत्या. कालू देवी, ममता देवी आणि कमलेश या 3 सख्ख्या बहिणींचे मृतदेह व 4 वर्षीय हर्षित आणि 26 दिवसांच्या नवजात अर्भकातचे मृतदेह नरेणा रोडजवळील विहिरीत ( 5 Bodies At Dudu Recovered ) सापडले. माहिती मिळताच दुडू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

तीन सख्ख्या बहिणींसह दोन मुलांचे विहिरीत आढळले मृतदेह
तीन सख्ख्या बहिणींसह दोन मुलांचे विहिरीत आढळले मृतदेह

दूदू (जयपुर ) - जयपूर जिल्हा ग्रामीणच्या दुडू पोलीस स्टेशन परिसरात 3 सख्ख्या बहिणींसह 2 मुलांचे मृतदेह सापडले ( Dudu Sisters dies by Suicide ) आहेत. विहिरीतून 3 महिला आणि दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. हुंड्यामुळे या तिघींनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

25 मे रोजी दुपारी दोन मुलांना घेऊन बहिणी घराबाहेर पडल्या ( Dead Bodies Of 3 Sisters ) होत्या. कालू देवी, ममता देवी आणि कमलेश या 3 सख्ख्या बहिणींचे मृतदेह व 4 वर्षीय हर्षित आणि 26 दिवसांच्या नवजात अर्भकातचे मृतदेह नरेणा रोडजवळील विहिरीत ( 5 Bodies At Dudu Recovered ) सापडले. माहिती मिळताच दुडू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

तीन सख्ख्या बहिणींसह दोन मुलांचे विहिरीत आढळले मृतदेह

सासरी होणाऱ्या मारहाणीमुळे तिघींचा छळ - दोन मुलांसह तीन महिलांचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये ममता देवी 8 महिन्यांची आणि कमलेश ही 9 महिन्यांची गरोदर होती. सासरी होणाऱ्या मारहाणीमुळे तिघींचा छळ होत असल्याचा आरोप होत आहे. त्या बराच वेळ तणावाखाली होते, असा आरोप आहे. अशा परिस्थितीत सासरच्या छळाला कंटाळून तिघींनी दोन मुलांसह आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मृत बहिणींच्या भावाची तक्रार
मृत बहिणींच्या भावाची तक्रार

सासरच्यांनी खूप छळ केला - मृताचे नातेवाईक हेमराज मीना यांनी सांगितले की, तिन्ही सख्ख्या बहिणींचे एकाच घरात लग्न झाले होते. सासू, नणंद आणि तिन्ही महिलांचे पती हे सासरच्या घरात खूप त्रास देत असे. तिन्ही सख्ख्या बहिणींना त्यांचे मारहाण करायचे. 10 दिवसांपूर्वी सासरच्या मंडळींनी मारहाण आणि छळ करून तिन्ही बहिणींना घरातून हाकलून दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिन्ही सख्ख्या बहिणींना त्यांच्या माहेरी आणण्यात आले. मारहाणीमुळे कालू देवी यांच्या डोक्याला आणि डोळ्यालाही जखमा झाल्या होत्या. त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिन्ही सख्ख्या बहिणींच्या कुटुंबीयांनी अनेकवेळा सासरच्या मंडळींशी चर्चा केली. मात्र त्यानंतरही त्यांच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. दबावामुळे अखेर तिघांनीही सामूहिक आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याची भीती व्यक्त होत आहे. आता मृतांचे नातेवाईक सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करणार आहेत.

पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप- मृतांचे नातेवाईक हेमराज मीना म्हणाले, की सख्ख्या बहिणींसह घरातून बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईक दुडू पोलीस ठाण्यात पोहोचले. तेव्हा पोलिसांनी प्रथम तक्रार नोंदविण्यास नकार दिला. ग्रामस्थांचा विरोध पाहून पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची नोंद केली. मात्र २४ तास पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. यावर नातेवाईकांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि महिला आयोगाकडे तक्रार केली. तेव्हा स्थानिक आमदाराने कुटुंबीयांवर दबाव आणण्यास सुरुवात केली. स्थानिक आमदार बाबूलाल नगर ( MLA Babulal Nagar Blamed in Dudu Sisters Death) यांनी तक्रार न करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.

हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप- तीन बहिणी हरवल्याप्रकरणी भावाने पीयूसीएलच्या सरचिटणीस कविता श्रीवास्तव यांना पत्र लिहिले (Dowry Angle In Dudu Sisters Suicide). होते. सासरच्या लोकांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला. भावाने लिहिलेल्या पत्रात तिन्ही बहिणींचे लग्न दुडू परिसरात झाल्याचा आरोप आहे. तीन बहिणी तीन दिवसांपासून बेपत्ता आहेत. पोलिसांनी २४ तास कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोपही भावाने केला आहे.

हेही वाचा-Tiger Sitting Near Railway Track : रेल्वे रुळावर बसलेल्या वाघाने लोकांची उडविली घाबरगुंडी

हेही वाचा-PM Modi Gujarat Visit : बापूंच्या स्वप्नांचा भारत घडवित आहोत - नरेंद्र मोदी

हेही वाचा-India criticizes OIC IPHRC : यासिन मलिकच्या शिक्षेवर टिपण्णी करणाऱ्या इस्लामिक संघटनेवर भारताची तिखट प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.