ETV Bharat / city

ST Workers Strike : परब यांनी एसटीच्या स्टेअरिंगवर बसावे, ...झाला तर डॉक्टर पाठवतो - नितेश राणे

author img

By

Published : Nov 22, 2021, 6:38 PM IST

Updated : Nov 22, 2021, 7:50 PM IST

राज्यात एसटी कामगारांचा संप सुरू आहे. या संपाला भाजपने पाठिंबा दिला आहे. भाजप आमदार नितेश राणे(BJP Mla Nitesh Rane) यांनी ठाण्यातील खोपट एसटी डेपोत(Khopat ST Depo Thane) जाऊन संपात बसलेल्या कामगारांची(ST Workers Strike) भेट घेतली.

Nitesh Rane
नितेश राणे

ठाणे - भाजप आमदार नितेश राणे(BJP Mla Nitesh Rane) यांनी ठाण्यातील खोपट एसटी डेपोत(Khopat ST Depo Thane) जाऊन संपात बसलेल्या एसटी कामगारांची(ST Workers Strike) भेट घेतली. यावेळी त्यांनी डेपोत उभी असलेल्या एसटीची अवस्था देखील जाणून घेतली. एसटीचे स्टेअरिंग हातात घेत ती चालवत असताना चालकांना काय त्रास होतो, कशी आहे एसटीची अवस्था याचा आढावा राणे यांनी घेतला. यावेळी एसटीची अवस्था पाहून राणे चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. परिवहनमंत्री अनिल परब(Minister Anil Parab) यांनी एसटीच्या स्टेअरिंगवर बसावे आणि मूळव्याध झाला तर डॉक्टर पाठवेल, असे म्हणत नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.

नितेश राणे यांनी केली एसटी बसची पाहणी
  • परिवहनमंत्र्यांवर टीका -

यावेळी आमदार निरंजन डावखरे यांच्यासह नितेश राणे यांनी कामगारांच्या व्यथा जाणून घेतल्या. भाजप तुमच्यासोबत आहे, कामगारांची एकजूट काय असते हे तुम्ही दाखवून दिले आहे. त्यामुळे तुमचं कौतुक, तुमचा विजय जास्त लांब नाही. त्यामुळे एकजूट ठेवा, असे आवाहन नितेश राणे यांनी कामगारांना केले. तसेच त्यांनी राज्य सरकार आणि परिवहनमंत्री परब यांच्यावर जोरदार टीका केली.

Nitesh Rane
नितेश राणे यांनी केली एसटीची पाहणी
  • अनिल परब यांनी स्टेअरिंग हाती घेऊन बघावे -

एसटी महामंडळाच्या बसची दुरावस्था पाहिल्यानंतर चिडलेल्या नितेश राणे यांनी मंत्री परब यांच्यावर निशाणा साधला. परब यांनी आपला बंगला सोडून या एसटी बसेसची अवस्था पाहावी, जेणेकरून त्यांची व्यथा समजू शकेल. अशा बस चालवून चालक आणि वाहक दोघांनाही आजारपण येणार नाही का? असा सवाल देखील यावेळी नितेश राणे यांनी विचारला.

Last Updated : Nov 22, 2021, 7:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.