ETV Bharat / city

Railway MOS Raosaheb Danve : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी भजे, वडापाववर मारला ताव

author img

By

Published : Feb 18, 2022, 4:14 PM IST

Updated : Feb 22, 2022, 4:41 PM IST

रेल्वे मंत्री, राज्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी आज ठाण्यात वडा पाव, भजी पाव यावर यथेच्छ ताव ( Raosaheb Danve Wadapav Issue Thane ) मारला. त्यांच्यासोबत अंदाजे दोनशे कार्यकर्तेही होते. कार्यकर्त्यांनीही चहा, नाश्ता केला. मात्र, हॉटेलचे झालेले बिल न देता हे सगळे निघून गेल्याने हॉटेल चालकाला आर्थिक भुर्दंड बसला आहे. ( Railway MOS Raosaheb Danve Thane )

रेल्वे मंत्री, राज्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी आज ठाण्यात वडा पाव, भजी पाव यावर यथेच्छ ताव मारला.
रेल्वे मंत्री, राज्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी आज ठाण्यात वडा पाव, भजी पाव यावर यथेच्छ ताव मारला.

ठाणे : एखादा सर्वसामान्य नागरिक जर हॉटेलमध्ये खाऊन झाल्यावर पैसे न भरता निघून गेला तर हॉटेलचालक किती चिडतो हे आपण पाहिले असेलच. असाच काहीसा प्रकार ठाण्यात पाहायला मिळाला आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Minister of State for Railways Raosaheb Danve ), इतर मंत्री, आणि कार्यकर्त्यांनी आज ठाण्यात एका हॉटेलमध्ये जात वडा पाव, भजी पाववर यथेच्छ ताव मारला. नाश्ता करताना हे सगळे अगदी तुटून पडलेले पाहायला मिळाले. मात्र चहा, नाश्ता झाल्यानंतर हॉटेलचे ३ हजार ९५० रुपयांचे बिल न देता मंत्री त्यांच्या कार्यकर्त्यांसह निघून गेले आहेत ( Raosaheb Danve Left Hotel Without Paying Bill In Thane ) .

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी भजे, वडापाववर मारला ताव, हॉटेलचे बिल न देताच झाले पसार..

शेकडो वडापाव आणि अनेक प्लेट भज्यांवर मारला ताव

ठाणे स्थानकाच्या बाहेर असलेल्या गजानन या प्रसिद्ध वडा पाव विक्रेत्याच्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ( Railway Minister Ashwini Vaishnaw ) यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील ( Minister Kapil Patil ) , खासदार विनय सहस्त्रबुद्धे ( MP Vinay Sahasrabudhe ) , भाजप आमदार संजय केळकर ( MLA Sanjay Kelkar ) , आमदार निरंजन डावखरे ( MLA Niranjan Dawkhare ) यांनी ठाणे ते दिवा आणि दिवा ते ठाणे असा रेल्वे प्रवास केला. त्यानंतर ठाणे स्थानकाच्या बाहेर भूक लागल्यावर वडा पाव वर ताव मारलाय. मात्र शेकडो वडापाव आणि अनेक भजी प्लेट खाल्यानंतर ते आणि त्यांचे कार्यकर्ते बिल न देताच निघून गेले आहेत.

हॉटेल
हॉटेल

सकाळपासून मंत्री हजर

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मध्य रेल्वेच्या 5 व्या आणि 6 व्या मार्गिकेच्या उदघाटनाचा कार्यक्रम घेणार आहेत. त्यासाठी ठाणे स्थानकात सकाळपासून अनेक मंत्री हजर आहेत.

हॉटेल
हॉटेल

रेल्वे प्रवास करून घेतल्या अडचणी जाणून

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकल प्रवास करून प्रवाश्यांशी चर्चा देखील केली. त्यांच्या अडचणी जाऊन घेतल्या आणि लवकरात लवकर अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

येथे झालेल्या हाॅटेलच्या बिलावरुन वेगवेगळ्या चर्चा रंगल्या, दरम्यान मध्य रेल्वेने मात्र वडापाव आणि चहाचे बिल दिल्याचा खुलासा केला आहे.

हेही वाचा : 'ईटीव्ही भारत'च्या बातमीचा परिणाम.. मंत्री रावसाहेब दानवेंनी नाश्ता केलेल्या 'त्या' हॉटेलचे बिल अखेर भरले..

Last Updated : Feb 22, 2022, 4:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.