ETV Bharat / city

...पण कोरोना आपल्याला कंटाळलेला नाही; मंत्री आदित्य ठाकरेंची ठाणे मनपाला भेट

author img

By

Published : Jul 4, 2020, 9:27 PM IST

ठाणे शहरातील वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या पाहता, मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज (शनिवार) ठाणे महानगरपालिकेला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत बोलताना, विरोधकांना त्यांचे काम करू द्या. आम्ही आमचे काम करत आहोत, असे म्हटले आहे.

minister aditya thackeray visit thane municipal corporation
आदित्य ठाकरेंची ठाणे महापालिकेला भेट

ठाणे - शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, मंत्री आदित्य ठाकरे आज (शनिवार) ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के, ठाणे पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आदी यांच्यासोबत बैठक घेतली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासन योग्य ती पाऊले उचलत आहे. ठाणेकरांनी देखील योग्य ती काळजी घेतली पाहिजे. तसेच पुन्हा करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा नागरिकांनी गंभीरपणे विचार करून गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

आदित्य ठाकरेंची ठाणे महापालिकेला भेट...

हेही वाचा - 'वा रे वा..! मंत्र्यांना गाड्या घ्यायला पैसे आहेत, अन् कोरोनाच्या पॅकेजसाठी नाहीत'

ठाण्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. ठाणे परिसरातील कोरोनाची ही साखळी आपल्याला तोडायची असेल, तर नागरिकांना घरीच रहावे. ठाणेकरांनी घाबरून न जाता कोरोनाशी दोन हात करण्यासाठी तयार रहा, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

रुग्ण कसे कमी होतील, याकडे प्रशासनासाचे लक्ष आहे. यासाठी लागणाऱ्या यंत्रणा, सामुग्री पुरवण्यात येत आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेत असून लवकरात लवकर कोरोना कसा हद्दपार करता येईल, यासाठी सरकार आणि पालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. नागरिकांनी देखील यात सहकार्य करावे, अशी अपेक्षा ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा - राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यामागे महाविकास आघाडीत वेगवेगळी मतं असण्याची शक्यता

आपण कोरोनाला कंटाळलो आहोत पण कोरोना आपल्याला कंटाळला नाही...

ठाण्यातच नव्हे तर राज्यात आणि देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक उद्योग धंदे बंद पडले आहेत. मागील अनेक महिन्यांपासून नागरिक घरीच आहेत. परंतु, आपण जरी कोरोनाला कंटाळलो असलो, तरिही कोरोना मात्र आपल्याला कंटाळलेला नाही, असे सांगताना आदित्य ठाकरेंनी नागरिकांनी घरीच राहून प्रशासनाला, राज्य सरकारला सहकार्य करावे असे सांगितले.

कोरोनाबाबत आज माहपालिकेत बैठक घेतलेल्या बैठकीत जास्तीत जास्त तपासण्या करण्याकरिता सांगण्यात आल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.