ETV Bharat / city

Thane Viral Video : लग्न मंडपाला भीषण आग; तरीही पठ्ठ्या मारतो मटणावर ताव!

author img

By

Published : Nov 30, 2021, 9:21 PM IST

Updated : Nov 30, 2021, 9:35 PM IST

मॅरेज हॉलमध्ये कुठल्याही प्रकाराची सुरक्षा व आगीपासून बचावाची सुविधा नसल्याने लग्न मंडपाला भाषण ( fire break out in Thane marriage hall ) आग लागली. ही बाब पोलिसांच्या तपासात समोर आली. त्यावरून पोलीस नाईक महेश चौधरी यांच्या तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

http://10.10.50.85//maharashtra/30-November-2021/mh-tha-2-bhiwandi-1-vis-1-photo-mh-10007_30112021165223_3011f_1638271343_332.png
http://10.10.50.85//maharashtra/30-November-2021/mh-tha-2-bhiwandi-1-vis-1-photo-mh-10007_30112021165223_3011f_1638271343_332.png

ठाणे - 'आग लगी बस्ती मे गंगाराम अपने मस्ती मे' या हिंदी म्हणीप्रमाणे घटना समोर आली आहे. एका लग्न समारंभात मंडपाला भीषण आग लागली असताना एक खवय्या आगीची चिंता न करता मटनाच्या मेजवानीवर ( Man eating non veg during fire incident ) ताव मारत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर ( Thane Man food eating viral video ) व्हायरल झाला आहे. ही घटना भिवंडी शहरातील अन्सारी मॅरेज हॉलमध्ये रविवारी रात्री उशिरा घडली होती.

विवाह समारंभात आग लागल्याच्या प्रकरणात शांतीनगर ( Police case against Marriage hall manager ) पोलीस ठाण्यात विविध कलमासह हॉल व्यवस्थापकांसह वर आणि वधू पक्षाकडील अश्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

खवय्या आगीची चिंता न करता मटनाच्या मेजवानीवर ताव मारताना

हेही वाचा-Mahaparinirvana Day Guidelines : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्गदर्शक सूचना जाहीर

लग्नमंडपाच्या लगत उभ्या असलेल्या डझनभर दुचाक्या जळून खाक
भिवंडी शहरातील गैबीनगर मध्ये राहणाऱ्या तरुणीचे दिवानशाह दरगाह भागात राहणाऱ्या तरुणासोबत भिवंडीतील अन्सारी मॅरेज हॉलमध्ये रविवारी सायंकाळी निकाह होता. त्यावेळी मोकळ्या जागेतील लग्न मंडप पाहुण्यांनी खचाखच भरलेला असताना अचानक फटक्यांची आतिषबाजी सुरू झाली. त्यांनतर एका फटाक्याची ठिणगी उडून लग्न मंडपाने पेट घेतला. ही आग हळूहळू वाहन पार्किंगपर्यत पोहोचून आगीचे भीषण रूपांतर झाले. काही वेळातच संपूर्ण विवाह ( fire break out in Thane marriage hall ) मंडप जळून खाक झाला. मोठ्या कष्टाने वधू-वरांची सुटका करण्यात आली. मात्र, लग्नमंडपाच्या लगत उभ्या असलेल्या डझनभर दुचाक्या जळून खाक झाल्या.

हेही वाचा-Chandiwal Commission : अनिल देशमुख, परमवीर सिंग, सचिन वाझेंची एकत्रित चौकशी होणार


हॉल व्यवस्थापकांसह वर आणि वधू पक्षावर गुन्हा दाखल ...
मॅरेज हॉलमध्ये कुठल्याही प्रकाराची सुरक्षा व आगीपासून बचावाची सुविधा नसल्याने लग्न मंडपाला भाषण आग लागली. ही बाब पोलिसांच्या तपासात समोर आली. त्यावरून पोलीस नाईक महेश चौधरी यांच्या तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉलचा मॅनेजर समीर उर्फ जावेद शेख, गैबीनगर भागात राहणारे गुलाम मोहंमद अब्दुल रजाक खान आणि दिवाणशाह परिसरात राहणारे गुलाम रसूल खान अश्या तिघा विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा-Mumbai School Reopening : मुंबईतील शाळा १५ डिसेंबरपासून सुरू होणार

Last Updated : Nov 30, 2021, 9:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.