ETV Bharat / city

दुसऱ्यांच्या पोराला आपलं म्हणायची भाजपची जुनी खोड- जितेंद्र आव्हाड

author img

By

Published : Jan 18, 2021, 2:55 AM IST

Updated : Jan 18, 2021, 5:47 AM IST

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचा मेळावा रविवारी वाशी येथे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आमदार गणेश नाईक यांच्यावर टीका केली. ते

जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड

नवी मुंबई- नवी मुंबईत भाजपचे नगरसेवक हे राष्ट्रवादी व शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. महाविकासआघाडी सरकारवर पोलीस बळाचा उपयोग नगरसेवकांवर दबाव टाकण्यासाठी केला जात असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. त्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, दुसऱ्यांच्या पोराला आपले म्हणायची भाजपची जुनी खोड आहे. ते वाशी येथील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचा मेळावा रविवारी वाशी येथे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आमदार गणेश नाईक यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, मुळात भाजप नेते आमदार गणेश नाईक जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, तेव्हा नवी मुंबई मनपाच्या निवडणूका पार पडल्या होत्या. त्यानंतर काही कालावधीनंतर सर्व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे गणेश नाईकांना सोडचिठ्ठी देत महाविकास आघाडीमध्ये येणारे नगरसेवक हे त्यांचे नगरसेवक नाहीत. तर राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झालेले नगरसेवक आहेत. दुसऱ्याच्या पोराला मांडीवर घेऊन आपले म्हणायची ही भाजपची जुनी पद्धत आहे.

महाविकास आघाडी बैठक
महाविकास आघाडी बैठक
दुसऱ्यांच्या पोराला आपलं म्हणायची भाजपची जुनी खोड



मुंबईतील ससून डॉकचे स्थलांतर नवी मुंबईत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार:

सीमांकन 2 किलोमीटरपर्यंत वाढवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मुंबईतील ससून डॉकचे स्थलांतर नवी मुंबईत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी दिले.

सीमांकन 2 किलोमीटरपर्यंत वाढवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी


28 पक्षांशी युती करून निवडणूक लढविणाऱ्यांंनी आम्हाला सांगू नये-

हिंमत असेल तर एकटे या, असे आव्हान भाजपचे प्रभारी आशिष शेलार यांनी महाआघाडी सरकारला दिले होते. त्यावरही आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 1990 सालापासून भाजप शिवसेनेची युती होती. मग ते नक्की काय होते? केंद्रात 28 पक्षांशी युती करून निवडणूक लढविणाऱ्यानी आम्हाला सांगू नये असा टोला आव्हाड यांनी आशिष शेलार यांना लगावला.

Last Updated : Jan 18, 2021, 5:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.