ETV Bharat / city

Mandul Snake Smuggling Thane काळ्या जादूसाठी ७० लाखांत दुर्मिळ मांडूळ साप विकणारे पाच तस्कर जेरबंद

author img

By

Published : Aug 22, 2022, 7:30 PM IST

काळी जादू Black magic आणि औषधी पदार्थच्या विक्रीसाठी medicinal products Sale दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाची smuggling sand boa ७० लाखांत विक्री करणाऱ्या पाच तस्करांना Mandul snake smuggler arrest Thane कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी Khadakpada Police Station Kalyan सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून मांडूळ जातीचा वन्यसर्पसह गुन्ह्यात वापरलेल्या तीन दुचाक्या जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. निलेश हीलि, चेतन कांबळे, अरविंद पंडित, विशाल ठाकरे, अनिल काटे असे अटक केलेल्या तस्करांची नावे आहेत. मात्र सहावा तस्कर पोलिसांना गुंगारा देत फरार झाला आहे.

Mandul snake smuggler arrest Thane
काळ्या जादूसाठी ७० लाखांत दुर्मिळ मांडूळ साप विकणारे पाच तस्कर जेरबंद

ठाणे काळी जादू Black magic आणि औषधी पदार्थच्या विक्रीसाठी medicinal products Sale दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाची smuggling sand boa ७० लाखांत विक्री करणाऱ्या पाच तस्करांना Mandul snake smuggler arrest Thane कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी Khadakpada Police Station Kalyan सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून मांडूळ जातीचा वन्यसर्पसह गुन्ह्यात वापरलेल्या तीन दुचाक्या जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. निलेश हीलि, चेतन कांबळे, अरविंद पंडित, विशाल ठाकरे, अनिल काटे असे अटक केलेल्या तस्करांची नावे आहेत. मात्र सहावा तस्कर पोलिसांना गुंगारा देत फरार झाला आहे. Mandul snake smuggling arrest Thane

सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने- पाटील मांडूळ साप जप्ती प्रकरणी माहिती देताना


तस्करांना पकडण्यासाठी रचला पोलिसांनी सापळा कल्याण पोलीस परिमंडळ कार्यलयातील विशेष पथकाला खबऱ्यामार्फत माहिती मिळाली कि, रविवारी सायंकाळच्या सुमारास पडघा मार्गे काही तस्कर दुचाकीवरून दुर्मिळ मांडूळ जातीचा वन्यसर्प कल्याणात विक्री करणाऱ्यास येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस उपआयुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदशनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), शरद झिने, पोलीस उपआयुक्त विशेष पथकातील पोलीस कर्मचार संजय पाटील, ऋषिकेश भालेराव, सदाशिव देवरेसह पोलीस पथकाने रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पडघा – कल्याण मार्गावरील अग्रावाल कॉलेज नजीक सापळा रचला.

Officer showing Mandul snake
मांडूळ साप दाखविताना अधिकारी


मांडूळ साप २ किलो ६०० ग्राम वजनाचा त्यावेळी तीन दुचाकीवरून सहा जण संशयरीत्या येताना पथकाला दिसल्याने त्यांना थांबवून त्यांच्या जवळ असलेल्या पिशवीची झडती घेतली त्यामध्ये मांडूळ साप आढळला. त्यानंतर पाच तस्करांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मांडूळ साप जप्त केला. हा साप २ किलो ६०० ग्राम वजनाचा असून साडेतीन फूट लांब आहे. या तस्कर टोळीने आणखी किती लोकांना मांडूळ साप विकलेय याचा तपास पोलीस करत असून अटक तस्कर हे पालघर , भिवंडी, टिटवाळा परिसरात राहणारे आहेत.

दुर्मिळ मांडूळ सापाचा यासाठीही होतो वापर
मांडुळ जातीच्या सापांच्या अंगातील द्रव्य औषधासाठी उपयोगी पडत असल्याने औषध कंपन्यांकडून हे द्रव्य काढल्यानंतर त्याच्यापासून औषधे बाजारात विकली जाते. तसेच मांडूळ जातीच्या सापाची काळ्या जादूच्या नावाखालीही तस्करी केली जाते. जेवढा मोठा मांडूळ तेवढी लाखोंची रक्कम तस्कर ठरवीत असल्याचे पोलिसांनी अनेक वेळा पकडलेल्या तस्करांकडून उघडकीस आणले आहे.

हेही वाचा Baramati Rape अल्पवयीन मुलीला ओढत नेत शेतात बलात्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.