ETV Bharat / city

विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शिक्षकांनी देशाचे भवितव्य घडवावे - पालकमंत्री एकनाथ शिंदे

author img

By

Published : Sep 5, 2019, 7:58 PM IST

ठाणे जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षक पूरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या क्रार्यक्रमाला पालकमंत्री शिंदे उपस्थित होते.

ठाणे जिल्हापरिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन

ठाणे - जिल्हा परिषदेच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळेतील वाढलेली पटसंख्या हे त्याचे उदाहरण आहे. अशाच पद्धतीने शिक्षण क्षेत्रात होणारे बदल आत्मसात करुन शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देशाचे भवितव्य घडवावे, असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

ठाणे जिल्हापरिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन

हेही वाचा - पंतप्रधान मोदींच्या हस्ते कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाचे 7 सप्टेंबरला भूमिपूजन

ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त दहा आदर्श शिक्षकांना जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. या वेळी हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, खासदार कपिल पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दिपाली पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, जिल्हा परिषदेचे सभापती वैशाली चंदे, किशोर जाधव, संगीता गांगड, सपना भोईर, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालालजी सोनावणे, शिक्षणाधिकारी संगीता भागवत आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी जिल्ह्यातील दहा आदर्श शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

शिक्षण हा प्रगतीचा पाया आहे. शिक्षणामध्ये क्रांती घडविण्याची ताकद आहे, हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वाढलेल्या पटसंख्येच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण दिले जात आहे, याची खात्री होते. अशाच पद्धतीने देशाचे उत्तम नागरिक घडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांना कायम मदतीचा हात देत असून, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

हेही वाचा - ठाण्यात 'वाचाल तर वाचाल' असा संदेश देणारे बाप्पाची स्थापना

प्रत्येक शिक्षकाने आईच्या भूमिकेत जाऊन कार्य केल्यास देशात एकही ट्यूशन क्लास सुरू राहणार नाही, असे मत खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले. ज्या क्षेत्रात विद्यार्थ्याला गती असेल, त्या क्षेत्रात विद्यार्थ्याचा नावलौकिक कसा होईल, याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे. आदर्श शिक्षकांप्रमाणेच आदर्श शाळांसाठीही स्पर्धा घ्यावी, असे आवाहन खासदार पाटील यांनी केले.

ग्रामीण भागातील शाळांना वीज बिलांचा वाढता खर्च भेडसावतो. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सौरऊर्जेवरील प्रकल्प उपलब्ध केल्यास शाळांना सुविधा होईल. त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नाविन्यपूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दिपाली पाटील यांनी दिली.

पुरस्कारप्राप्त शिक्षक -

गिरीश नामदेव ठाकरे, (जांभूळ शाळा, ता. कल्याण) चारुशिला किरण भामरे (आघाणवाडी शाळा, ता. अंबरनाथ) रमेश मंगल्या म्हसकर (जोळा, ता. भिवंडी) संजय गोविंद उंबरे (पाटगाव, ता. मुरबाड) प्रमोद भाऊ पाटोळे (वायाचापाडा, ता. शहापूर) मोहिनी पंडीत बागूल ( मुळगाव, ता. अंबरनाथ) अंकूश नारायण ठाकरे (राहनाळ, ता. भिवंडी) नारायण घावट (भिसोळ, ता. कल्याण) डॉ. निळकंठ रामचंद्र व्यापारी, (आंबेळे खु., ता. मुरबाड) भगवान दुंदा फर्डे (मुगाव, ता. शहापूर)

Intro:विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शिक्षकांनीदेशाचे भवितव्य घडवावे

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहनBody:



जिल्हा परिषदेच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळेतील वाढलेली पटसंख्या हे त्याचे उदाहरण आहे. अशाच पद्धतीने शिक्षण क्षेत्रात होणारे बदल आत्मसात करुन शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देशाचे भवितव्य घडवावे, असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्ताने दहा आदर्श शिक्षकांना जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. या वेळी हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, खासदार कपिल पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दिपाली पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, जिल्हा परिषदेचे सभापती वैशाली चंदे, किशोर जाधव, संगीता गांगड, सपना भोईर, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालालजी सोनावणे, शिक्षणाधिकारी संगीता भागवत आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी जिल्ह्यातील दहा आदर्श शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
शिक्षण हा प्रगतीचा पाया आहे. शिक्षणामध्ये क्रांती घडविण्याची ताकद आहे, हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वाढलेल्या पटसंख्येच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण दिले जात आहे, याची खात्री होते. अशाच पद्धतीने देशाचे उत्तम नागरिक घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांना कायम मदतीचा हात देत असून, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.
प्रत्येक शिक्षकाने आईच्या भूमिकेत जाऊन कार्य केल्यास देशात एकही ट्यूशन क्लास सुरू राहणार नाही, असे मत खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले. ज्या क्षेत्रात विद्यार्थ्याला गती असेल, त्या क्षेत्रात विद्यार्थ्याचा नावलौकिक कसा होईल, याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे. आदर्श शिक्षकांप्रमाणेच आदर्श शाळांसाठीही स्पर्धा घ्यावी, असे आवाहन खासदार पाटील यांनी केले.
ग्रामीण भागातील शाळांना वीज बिलांचा वाढता खर्च भेडसावतो. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सौरऊर्जेवरील प्रकल्प उपलब्ध केल्यास शाळांना सुविधा होईल. त्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नाविन्यपूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दिपाली पाटील यांनी दिली.
पुरस्कारप्राप्त शिक्षक
गिरीश नामदेव ठाकरे, जांभूळ शाळा, ता. कल्याण, चारुशिला किरण भामरे, आघाणवाडी शाळा, ता. अंबरनाथ, रमेश मंगल्या म्हसकर, वैजोळा, ता. भिवंडी, संजय गोविंद उंबरे, पाटगाव, ता. मुरबाड, प्रमोद भाऊ पाटोळे, वायाचापाडा, ता. शहापूर, मोहिनी पंडीत बागूल, मुळगाव, ता. अंबरनाथ, अंकूश नारायण ठाकरे, राहनाळ, ता. भिवंडी, नारायण घावट, भिसोळ, ता. कल्याण, डॉ. निळकंठ रामचंद्र व्यापारी, आंबेळे खु., ता. मुरबाड, भगवान दुंदा फर्डे, मुगाव, ता. शहापूर.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.