ETV Bharat / city

Eknath Shinde slammed Narayan Rane : कोकणातील हत्याकांडाची चौकशी झाली पाहिजे - एकनाथ शिंदे

author img

By

Published : Feb 19, 2022, 6:52 PM IST

Updated : Feb 19, 2022, 7:09 PM IST

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde on murder in Pune ) म्हणाले, की कोकणामध्ये कितीतरी हत्याकांड झाली आहेत. त्यांच्या चौकशीतून काय निष्पन्न काय झाले ? आरोपी व सूत्रधार मिळाला नाही. नारायण राणे ( Eknath Shinde slammed Narayan Rane ) आज केंद्रात मंत्री आहेत. केंद्राच्या तपास यंत्रणांनी रमेश मोरेचा विषय काढला तर कोकणातल्यादेखील हत्याकांडानंतर विषय काढावा.

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

ठाणे - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आरोपांवर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोकणात झालेल्या हत्याकांडाचीदेखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी ठाण्यात केली आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde on murder in Pune ) म्हणाले, की कोकणामध्ये कितीतरी हत्याकांड झाली आहेत. त्यांच्या चौकशीतून काय निष्पन्न काय झाले ? आरोपी व सूत्रधार मिळाला नाही. नारायण राणे ( Eknath Shinde slammed Narayan Rane ) आज केंद्रात मंत्री आहेत. केंद्राच्या तपास यंत्रणांनी रमेश मोरेचा विषय काढला तर कोकणातल्यादेखील हत्याकांडानंतर विषय काढावा. जनते समोर जे काय सत्य बाहेर यायला पाहिजे, असे ठाण्यात बोलताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

कोकणातील हत्याकांडाची चौकशी झाली पाहिजे

हेही वाचा-RTE Admission: आरटीई प्रवेशाला नागपूर- मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद; तीन दिवसांत ३० हजारपेक्षा अधिक अर्ज!

सॅटिस पुलामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत

ठाणे पूर्व येथे होत असलेल्या सॅटिस पुलामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहेत. यामुळे नागरिकांना निश्चितच दिलासा मिळणार आहे. तसेच या पुलामुळे वाहतूकही विभागली जाणार असल्यामुळे वाहतूकदारांनाही याचा फायदा होणार आहे. या सॅटिस प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या 15 महिन्यांत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे स्मार्ट सिटी ( Thane smart city work ) यांच्या संयुक्त विद्यमाने सॅटिस प्रकल्पातंर्गत उभारण्यात येणाऱ्या डेकचे (मल्टीमोडल ट्रान्झीट हब) भूमिपूजन ( Multimodal Transit Hub ) राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.

हेही वाचा-Rohit Sharma Test Team Captain : भारतीय संघाच्या कसोटी कर्णधारपदी रोहित शर्माची निवड, श्रीलंकेविरुध्द भारतीय संघाची घोषणा

12 बस थांबे असणार
मिडडेक फ्लोवर लेव्हल येथे प्रवाशांकरिता प्रतिक्षालय व आरामकक्ष या सुविधांचा समावेश आहे. तर डेक लेव्हल यास्तरावर सार्वजनिक बस टर्मिनलचा समावेश असणार आहे. त्यामध्ये 12 बस थांबे असणार आहेत. तसेच या मजल्यावर प्रवाशांकरिता तिकीट बुकिंग कार्यालय व प्रतिक्षाक्षेत्र यांचा समावेश करण्यात येणार आहे. ठाणे स्थानकातून वरच्या डेकवर जाण्यासाठी लिफ्टची सोयदेखील असणार आहे.

हेही वाचा-Narayan Rane on Sushant Disha : दिशा सालियानवर बलात्कार, हत्या.. - नारायण राणेंचा दावा

अॅक्शनला रिअॅक्शन मिळते..
महाविकास आघाडीत राहून सेनेतील नेते किंवा कार्यकर्त्यांवर टीका करत असाल तर कसे चालेल? समंजसपणा असावा. आम्ही पहिले टीका करत नाही. राष्ट्रवादीकडून टीका केली जाते. मग अॅक्शनला रिऍक्शन आम्ही देतो. आम्हाला ही महाविकास आघाडी हवी आहे. आम्हीही महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आहोत, असे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Last Updated : Feb 19, 2022, 7:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.