ETV Bharat / city

ठाण्यात 'दिवाळी पहाट'मध्ये तरुणाईचा जल्लोष

author img

By

Published : Oct 27, 2019, 1:35 PM IST

खासदार राजन विचारे यांच्यामार्फत ठाण्यात आयोजीत करण्यात आलेल्या 'दिवाळी पहाट' कार्यक्रमामध्ये तरुणाईचा जल्लोष पाहायला मिळाला.

ठाण्यात 'दिवाळी पहाट'मध्ये तरुणाईचा जल्लोष

ठाणे - दरवर्षी प्रमाणे खासदार राजन विचारे यांच्यामार्फत ठाण्यात आयोजीत करण्यात आलेल्या 'दिवाळी पहाट' कार्यक्रमामध्ये तरुणाईचा जल्लोष पहायला मिळाला. तसेच यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

ठाण्यात 'दिवाळी पहाट'मध्ये तरुणाईचा जल्लोष, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

हेही वाचा... मतदान झाले... दिवाळीसाठी सजल्या बाजारपेठा, खरेदीसाठी लोकांची लगबग वाढली

ठाणे शहरात रविवारी 'दिवाळी पहाट' हा सांस्कृतिक कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. ठाण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या तलावपाळी येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी खासदार राजन विचारे यांच्यातर्फ दिवाळी पहाट निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वेशभुषेत अवघी तरुणाई येथे अवतरली होती. कार्यक्रमातील गाण्यांवर युवा वर्गाने बेहोष होऊन नृत्य केले. तसेच कोळीगीतांसह अनेक पारंपारिक गाण्यांवर ठाणेकरांनी ठेका धरला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवर्जून भेट दिली आणि सर्व ठाणेकरांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा... एमआयएमच्या भिवंडी शहराध्यक्षपदी खालिद गुड्डू यांची नियुक्ती

सर्व अधिकार पक्षप्रमुखांना - एकनाथ शिंदे

शिंदे यांना राज्यातील सरकार स्थापनेबाबत आणि शिवसेनेच्या भुमिकेबाबत विचारले असता, त्यांनी कालच शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली आहे. तसेच बैठकीत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले असल्याचे सांगितले. तसेच तेच योग्य तो निर्णय घेतील, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

Intro:ठाण्यात दिवाळी पहाट मध्ये तरुणाईचा जल्लोष... पालकमंत्र्यांनी दिल्या सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छाBody:
ठाणे शहरात आज दिवाळी पहाट मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. ठाण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या तलावपाळी येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी खासदार राजन विचारे यांच्यातर्फ दिवाळी पहाट निमित्त एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रंगीबेरंगी पारंपारिक कपड्यात अवघी तरुणाई येथे अवतरली होती. कार्यक्रमातील गाण्यांवर तरुणतरुणी बेहोष होऊन नृत्य करून आपला आनंद व्यक्त करताना दिसत होती. कोळीगीतांसह अनेक पारंपारिक गाण्यांवर ठाणेकरांनी ठेका धरला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवर्जून भेट दिली सर्व ठाणेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. कालच शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक होऊन निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले असून योग्य तो निर्णय तेच घेतील अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
BYTE - एकनाथ शिंदे (पालकमंत्री ठाणे)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.