ETV Bharat / city

भातसा धरण झाले ओव्हरफ्लो, मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली

author img

By

Published : Sep 13, 2021, 2:16 AM IST

Updated : Sep 13, 2021, 3:14 AM IST

शहापूर तालुक्यातील एक महत्त्वाचे धरण म्हणजे भातसा हे धरण आहे. ते धरण ओव्हरफ्लो झाले असून, मुंबईकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे. विशेष म्हणजे धरण क्षेत्रात सात्यत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

भातसा धरण
भातसा धरण

ठाणे - मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी शहापूर तालुक्यातील एक महत्त्वाचे धरण म्हणजे भातसा हे धरण आहे. ते धरण ओव्हरफ्लो झाले असून, मुंबईकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे. विशेष म्हणजे धरण क्षेत्रात सात्यत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

भातसा धरण झाले ओव्हरफ्लो

धरणाचे पाचही दरवाजे 0.50 मीटरने उघडले

धरणातील आजची पाण्याची पातळी 141.70 मीटर एवढी आहे. तर, धरणाची क्षमता ही 141 मीटर एवढी आहे. यामुळे भातसा धरणाचे पाचही दरवाजे 0.50 मीटरने उघडण्यात आलेले आहेत. धरणातून 9 हजार 630.40 क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलेला आहे. त्यामुळे भातसा नदी लगतच्या गावांसह शहापूर मुरबाड रस्त्यालगत सापगाव नदी पुलावरून पाणी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रसंगी सावधानतेचा इशारा जलसंपदा खात्याकडून देण्यात आलेला आहे.

जलसंपदा खात्याकडून तहसील प्रशासनाला इशारा

धरणातून 9 हजार 630.40 क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आहे. उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभागाने एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकामध्ये शहापूर, कल्याण, भिवंडी तहसीलदार कार्यालय यांच्या माहितीसाठी व खबदारीचा उपाय म्हणून पुढील कार्यवासाठी सादर केले आहे. भातसा धरणाची पाणी पातळी पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे मुंबईकरांची आगामी काळातील पाण्याची चिंता एका प्रकारे मिटली आहे.

Last Updated : Sep 13, 2021, 3:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.