ETV Bharat / city

सोलापूर : बांधकाम व्यवसायिकासह मजुराला गावठी पिस्तूल अन् काडतुसासह अटक

author img

By

Published : Aug 21, 2021, 6:56 PM IST

Updated : Aug 21, 2021, 8:33 PM IST

सोलापूर पोलिसांच्या शहर गुन्हे शाखेच्या पथकाना एका बांधकाम व्यवसायिकासह अन्य एकाला गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसासह अटक केली आहे.

ि
ि

सोलापूर - शहरातील बांधकाम व्यवसायिक व मजुराला गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह शुक्रवारी (दि. 20 ऑगस्ट) रात्री अटक केली आहे.

माहिती देताना पोलीस निरीक्षक

खबऱ्याच्या माहितीवरुन पोलिसांनी लावला सापळा

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, विशाल यलप्पा गायकवाड व बांधकाम व्यवसायिक महादेव शंकर चव्हाण यांच्याकडे गावठी पिस्तूल असून ते मध्य रेल्वेच्या सिनियर सेक्शन इंजिनिअर कार्यालयासमोर येणार आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन बंडगर यांना खबऱ्या दिली होती. माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सातरस्ता ते रेल्वे स्टेशन दरम्यान असलेल्या काडादी चाळी समोरील सिनियर सेक्शन इंजिनिअर कार्यालय, येथील सय्यद गॅरेज बोर्डच्या रोडलगतच्या फुटपाथजवळ सापळा लावला होता. त्यावेळी विशाल यलप्पा गायकवाड (वय 25 वर्षे, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं. 4, सोलापूर) व महादेव शंकर चव्हाण (वय 29 वर्षे, रा. स्वामी विवेकानंद नगर, सैफुल, सोलापूर) त्या ठिकाणी आले.

आधी दिली उडवा-उडवीची उत्तरे, झडतीत सापडली पिस्तूल

त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पथकाने त्याच ठिकाणी दोघांची झडती घेतली असता विशाल गायकवाडने कंबरेजवळ पिस्तूल लपवल्याचे निदर्शनास आले तर खिशात एका प्लास्टिकच्या पिशवीत एक जिवंत काडतूस आढळले. पोलिसांनी दोघांकडे शस्त्राच्या परवान्याबाबत विचारणा केली. मात्र, परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब दोघांना अटक करुन त्यांच्याकडी गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस व दोन मोबाईल, असा 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यातील विशाल गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून बांधकाम व्यवसायिकाची कसून चौकशी सुरू आहे.

काय होता नेमका उद्देश याचा तपास सुरू

गावठी पिस्तूल हे कोणाला विकण्यासाठी आणण्यात आले होते किंवा याचा वापर कशासाठी करणार होते. याबाबत तपास सुरू असल्याचे गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा - सोलापुरात गॅस दरवाढी विरोधात महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे मूक आंदोलन

Last Updated : Aug 21, 2021, 8:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.