ETV Bharat / city

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे सोलापूर जिल्ह्यात तीर्थाटन

author img

By

Published : Dec 27, 2019, 1:19 PM IST

राज्याचे राज्यपाल महामहिम भगतसिंग कोश्यारी यांनी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी विद्यापीठाच्या कार्यक्रमानंतर जिल्ह्यातील तिर्थक्षेत्राना भेटी दिल्या.

governor-bhagat-singh-koshari-visit-to-pilgrimage-area-in-solapur-district
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे सोलापूर जिल्ह्यात तीर्थाटन

सोलापूर - राज्याचे राज्यपाल महामहिम भगतसिंग कोश्यारी यांनी काल अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे तर आज पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सुरू असलेल्या 23 व्या आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन व दीक्षांत समारंभासाठी ते सोलापूर दौऱ्यावर आले आहेत.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे सोलापूर जिल्ह्यात तीर्थाटन

विद्यापीठांच्या सोहळ्याव्यतिरिक्त मिळणाऱ्या वेळेत कोश्यारी यांनी तीर्थाटन करणे पसंत केले आहे. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर कोश्यारी यांनी गुरूवारी अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे ही दर्शन घेतले. तर आज दीक्षांत सोहळ्यापूर्वी पंढरपूरला जाऊन श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने त्यांना श्रींची प्रतिमा देऊन राज्यपालांचा सत्कार करण्यात आला.

या दौऱ्याच्या निमित्ताने राज्यपालांनी सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थानां भेटी देणे अपेक्षित असताना. कोश्यारी यांनी तीर्थक्षेत्र वारी केल्यामुळे त्यांनी दैववादाला चालना दिल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात सुरु आहे.

Intro:सोलापूर : राज्याचे राज्यपाल महामहिम भगतसिंग कोशायरी यांनी काल अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं तर आज पंढरपुरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सुरू असलेल्या 23 व्या आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाच्या उदघाटन व दीक्षांत समारंभासाठी ते सोलापूर दौऱ्यावर आले आहेत.Body:विद्यापीठांच्या सोहळ्याव्यतिरिक्त मिळणाऱ्या वेळेत कोशायरी यांनी तीर्थाटन करणं पसंत केलं आहे.क्रीडा महोत्सवाचे उदघाटन केल्यानंतर कोशायरी यांनी काल अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे ही दर्शन घेतले.तर आज दीक्षांत सोहळ्यापूर्वी पंढरपूरला जाऊन श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं.यावेळी मंदिर समितीच्यावतीने त्यांना श्रींची प्रतिमा देऊन राज्यपालांचा सत्कार करण्यात आला.Conclusion:या दौऱ्याच्या निमित्ताने राज्यपालांनी सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थानां भेटी देणं अपेक्षित असताना...कोशायरी यांनी तीर्थक्षेत्र वारी केल्यामुळं त्यांनी दैववादाला चालना दिल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात सुरु आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.