ETV Bharat / state

Gauri Pujan 2022: ज्येष्ठा गौरी आवाहनासाठी महिला भक्तगण झाल्या सज्ज

author img

By

Published : Aug 22, 2022, 1:25 PM IST

Updated : Sep 3, 2022, 4:25 PM IST

यंदा भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजेच ३१ ऑगस्टला गणराज भक्तांच्या भेटीला येणार आहेत. महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये गणपतीसह गौरीचे सुद्धा jyeshtha gauri aavahan आगमन होते. गौरी पूजन Jyeshtha Gauri Poojan महाराष्ट्रात विविध पद्धतीने केले जाते. गौरी ही साक्षात माता पार्वतीचे स्वरूप आहे, स्वतः पार्वती माता घरी माहेरपणाला येते अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवसात माहेरवाशिणीच्या आवडीचे गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. यंदा महाराष्ट्रात गौरीचे आवाहन कधी आहे याची तारीख, वेळ व पूजा विधी आपण जाणून घेऊयात

jyeshtha Gauri Aavahan
ज्येष्ठ गौरी आवाहन

पुणे महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये गणपतीसह गौरीचे सुद्धा आगमन jyeshtha gauri aavahan होते. गौरी पूजन Jyeshtha Gauri Poojan महाराष्ट्रात विविध पद्धतीने केले जाते. गौरी ही साक्षात माता पार्वतीचे स्वरूप आहे, स्वतः पार्वती माता घरी माहेरपणाला येते अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवसात माहेरवाशिणीच्या आवडीचे गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात.अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठागौरीचे आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर तिचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन, असे हे तीन दिवसांचे मूळ व्रत आहे. याला गौरी पूजन किंवा ग्रामिण भाषेत महालक्ष्म्या असे म्हटले जाते. यंदा ३ सप्टेंबर रोजी गौरी आवाहन व ४ सप्टेंबर गौरी पूजन केले जाणार आहे. ५ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन Gauri immersion आहे.

यंदा ज्येष्ठ गौरी आवाहन कधी आहे, घ्या जाणून



पंचांगानुसार गौरी पूजन तिथी Jyeshtha Gouri Puja Tithi गौरी आवाहन तारीख,शनिवार 3 सप्टेंबर रात्री 10 वाजून 56 मिनिटांपर्यंत ,ज्येष्ठा गौरी पूजन 4 सप्टेंबर रोजी तर गौरी विसर्जन सोमवारी 5 सप्टेंबर रात्री 8वाजून 05 पर्यंत आहे. गौरी पूजनाची पद्धत महाराष्ट्रात प्रत्येक गावानुसार वेगवेगळी आहे. काही घरांमध्ये तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांच्यावर गौराईचा फोटो किंवा मुखवटा लावून मग पूजन केले जाते. तर काही घरांमध्ये मातीच्या मूर्ती रूपात गौराईचे आगमन होते. काही भागांमध्ये हंड्यातून धान्य भरून त्या हंड्यांना साडी चोळी नेसवून दागदागिने घालून वर देवीचा मुखवटा लावला जातो. एकूणच निसर्गाच्या विविध रूपांमधील शक्तीचे पूजन हे गौरी पूजेचे औचित्य असते. महाराष्ट्रात गौरी पूजनाच्या दिवशी गौराईचा आवडीचा भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. यादिवशी माहेरवाशिणी व घरातील बहिणी, शेजारपाजारच्या मैत्रिणी एकत्र येऊन गौरीचे जागरण करतात. यंदा पाच दिवसांच्या गणपतींसह गौरीचे ५ सप्टेंबरला विसर्जन होणार आहे.



जेथे ज्ञान असते तेथे समृद्धी वसते. ज्ञान तेथे समृद्धी हे त्रिकालाधित सत्य आहे. हेच सूत्र आपल्याला भाद्रपद महिन्यात दिसून येते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आपण ज्ञानाचा देव म्हणून गणपतीची पूजा करतो, पंचमीला आपल्याला ज्ञान देणाऱ्या ऋषींची पूजा करतो पाठोपाठ अष्टमीला समृद्धीदेवता महालक्ष्मी, गौरीची पूजा करतो. हा उत्सव भाद्रपद शुद्ध अष्टमीला सुरु होत असल्याने या तिथीला दुर्वाष्टमी म्हणतात. या दिवशी दुर्वांची पूजा करितात. दुर्वांप्रमाणे वंशवेल वाढत राहावी अशी धारणा त्यामागे आहे. महालक्ष्मी हि अतिशय जागरूक देवता मानली जाते. हि समृद्धीची तसेच शौर्याची देवता आहे. जिथे ज्ञान तिथे समृद्धी त्याच्या रक्षणासाठी शौर्य आवश्यकच. अशाप्रकारे महालक्ष्मीचे व्रत म्हणजे आपल्या संस्कृतीतील स्त्रियांच्या समृद्धीला, शौर्याला असलेले महत्वच होय.

हेही वाचा Common University Entrance Eligibility Test देशातील सामायिक विद्यापीठ प्रवेश पात्रता परीक्षेच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात

Last Updated : Sep 3, 2022, 4:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.