ETV Bharat / city

Heavy Rain In Pune : पुण्यात अतिवृष्टीचा इशारा; उपाययोजनांसह जिल्हा प्रशासन सज्ज

author img

By

Published : Jul 7, 2022, 3:30 PM IST

पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू ( Heavy Rain In Pune ) आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला ( Warning of heavy rains in Pune ) आहे. हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनंतर जिल्ह्यात माळीन सारखी कोणतीही घटना घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील ज्या ज्या गावात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्या गावांमध्ये सर्वेक्षण करून त्या त्या वस्तीतील लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

Heavy Rain In Pune
पुण्यात अतिवृष्टीचा इशारा

पुणे - राज्यासह पुणे जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू ( Heavy Rain In Pune ) आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला ( Warning of heavy rains in Pune ) आहे. पुणे जिल्हा प्रशसनाच्यावतीने जिल्ह्यातील जी धोकादायक गावे, वस्ती आहेत. अश्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्यावतीने योग्य खबरदारी घेतली आहे. लोकांना रस्ते, आरोग्य, अन्नधान्य, वीज या सर्व सुविधा तसेच गावांमध्ये वॉकी टॉकी देण्यात आले आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची प्रतिक्रिया

जिल्हा प्रशासन सज्ज - हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनंतर जिल्ह्यात माळीन सारखी कोणतीही घटना घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील ज्या ज्या गावात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्या गावांमध्ये सर्वेक्षण करून त्या त्या वस्तीतील लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. तर काही गावांमध्ये रस्ते, अन्नधान्य, औषध उपचार तसेच संपर्क तुटू नये म्हणून वॉकी टॉकी देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात जर पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये जरी अतिवृष्टी झाली तरी या परिस्थितीत जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे देखील यावेळी आयुष प्रसाद यांनी यावेळी सांगितले.

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रशासनाने उचलली आहेत ही पावले -

  • अतिवृष्टी झाल्यास, कोणत्याही भूस्खलनापासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लोक हलवू शकतील अशी सुरक्षित ठिकाणे ओळखली जातात.
  • प्रत्येक गावातील GSDA मधील भूवैज्ञानिकांच्या मदतीने धोकादायक क्षेत्रे ओळखण्यात आली आहेत आणि सर्व ग्रामस्थांशी चर्चा देखील केली आहे.
  • रेशनचा पुरवठा आगाऊ करण्यात आला आहे.
  • प्रत्येक गावात ANM आणि ASHA कडे प्रथमोपचार आणि आवश्यक औषधे उपलब्ध करण्यात आले आहेत.
  • रुग्णवाहिका/जेसीबी स्टँडबायवर ठेवण्यात आल्या आहेत.आवश्यक भासल्यास ज्या त्या भागात लगेच पाठवण्यात येणार आहे.
  • ग्रामपंचायतींकडे तात्काळ आणि आवश्यक मदतीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
  • रस्त्यांची आवश्यक दुरुस्तीही पूर्ण करण्यात आली आहे.
  • डोंगरी तालुक्‍यातील तालुका पथके कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होणार नाही याची काळजी घेत आहेत. पावसाळ्यात रस्ते, वीज पुरवठा आणि दूरसंचार कनेक्टिव्हिटी अखंड असते.याची खबरदारी घेण्यात आली आहे.

हेही वाचा - Heavy rain in Vasai-Virar : वसई विरारमध्ये मुसळधार; शाळांना सुट्टी, वाहतूक ठप्प, रस्ते पाण्याखाली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.