ETV Bharat / city

Chandni Chowk: चांदणी चौकातील वाहतूक आज मध्यरात्रीपासून रोज अर्ध्या तासासाठी राहणार बंद

author img

By

Published : Oct 10, 2022, 5:00 PM IST

मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील एनडीए चौकातील (चांदणी चौक) दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यासाठी व नवीन पुलाच्या कामासाठी खडक फोडण्याचे काम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर चांदणी चौक येथील वाहतूक आज सोमवार (दि. 10 ऑक्टोबर)रोजीपासून काम पूर्ण होईपर्यंत दररोज मध्यरात्री १२.३० ते १.०० वाजेपर्यंत सर्व बाजूची वाहतूक बंद राहणार आहे. अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

पुणे - सद्यस्थितीत जुन्या पुलाच्या ठिकाणी साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या तीन लेन व मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या साडेचार लेन उपलब्ध करून देण्यात आल्या असून चांदणी चौक भागातील वाहतूक कोंडीची समस्या काही अंशी कमी झाली आहे अशीही माहिती त्यांनी दिली आहे. वाहतुकीच्या बदलाची नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस. एस. कदम यांनी केले आहे.

चांदणी चौकातील वाहतूक आज मध्यरात्रीपासून रोज अर्ध्या तासासाठी राहणार बंद

पुण्यातील चांदणी चौकातील पुल 600 किलो स्फोटाने ( Around 600 kg of explosive) आणि पोकलेन आणि जेसीबीच्या साहाय्याने अडीच वाजल्याच्या सुमारास पाडण्यात आला आहे. स्फोटकाने पुलाचा मध्यभाग पडला असल्याने एनएचएआय आणि जिल्हा प्रशासन यांनी केलेल नियोजनामध्ये अपयश आल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

चांदणी चौक
चांदणी चौक

पुल पाडण्यासाठी पुलामध्ये 1350 छिद्र करून 600 किलो स्फोटक वापरण्यात आले होते. हा पूल 6 सेकंदात जमीनदोस्त होईल असे सांगण्यात आले होते. मात्र 1 वाजता स्फोट झाला. अगदी काही सेकंदात पुलाचा मध्यभाग खाली आला. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूचा भाग अगदी आहे त्या स्थितीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे संपूर्ण पूल सहा सेकंदात जमीनदोस्त केला जाणार असे संबधित कंपनी आणि प्रशासनामार्फत सांगितले होते. मात्र पूल पडलाच नाही. त्यानंतर पोकलेन आणि जेसीबीच्या मदतीने दोन्ही बाजूने पूल पडण्यात आला आहे. अखेर अडीच वाजता हा पूल जमीनदोस्त करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.