ETV Bharat / city

Lonavala: पुण्यात अतिवृष्टीचा इशारा; लोणावळ्यासह पर्यटनस्थळी जाण्यास पर्यटकांना मज्जाव

author img

By

Published : Jul 16, 2022, 6:16 PM IST

पुणे जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टी चा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळं पर्यटनस्थळी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील काही पर्यटक पोलिसांची नजर चुकवून पर्यटनस्थळी पोहचत आहे. आणि धोकादायक पद्धतीने वर्षाविहाराचा आनंद घेत आहेत. त्यामुळे पर्यटकांना भुशी धरणावरून, लोणावळा पोलिसांनी लोणावळा लोणावळा पोलीस (Lonavala Police) हुसकावून लावल्याच बघायला मिळत आहे.

Lonavala
लोणावळ्यात पर्यटनस्थळ

पिंपरी-चिंचवड: पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढील दोन दिवस अतिवृष्टी चा इशारा हवामान विभागा कडुन देण्यात आला आहे. त्यामुळं पर्यटनस्थळी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील काही पर्यटक पोलिसांची नजर चुकवून पर्यटनस्थळी पोहचत आहे. आणि धोकादायक पद्धतीने वर्षाविहाराचा आनंद घेत आहेत. त्यामुळे पर्यटकांना भुशी धरणावरून, लोणावळा ( Lonavala Police ) पोलिसांनी हुसकावून लावल्याच बघायला मिळत आहे.

लोणावळा येथे आढावा घेतांना प्रतिनिधी

धोकादायक स्थळी जाण्यास बंदी: लोणावळ्यातील ( Lonavala)पर्यटनस्थळी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. तसे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. आज आणि उद्या रविवार पर्यंत हे आदेश लागू असतील. लोणावळा पोलिसांनी लोणावळ्यातील पर्यटन स्थळी जाणारे मार्ग बॅरिगेट्स लावून बंद केलेत. स्थानिक नागरिक आणि हॉटेल मधील बुकिंग पाहून पोलीस धोका नसलेल्या पर्यटनस्थळाकडे सोडत आहे. भुशी धरण, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट हे पर्यटकांविना ओस पडले आहे. परंतु, काही पर्यटक पोलिसांची नजर चुकवून थेट भुशी धरण किंवा इतर धोकादायक ठिकाणी जात असल्याच पाहायला मिळत आहे. आज आणि उद्या पर्यटकांना पर्यटनस्थळी येण्यास मज्जाव आहे. त्यामुळं पर्यटकांनी देखील सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन लोणावळा पोलिसांनी केले आहे.

सेल्फी काढण्याचे व्यसन धोकादायक: सेल्फी काढताना सावधान राहण्याचा इशारा अनेक वेळा जातो. मात्र, त्यानंतर देखील सेल्फीच्या नादात युवकाचा जीव गेल्याची घटना औरंगाबादच्या गौताळा अभयारण्यात समोर आली आहे. अविनाश पवार असे या 18 वर्षाच्या युवकाचे नाव असून पाण्यात पडल्यावर एक दिवसा नंतर त्याचा मृतदेह आढळून आला. अविनाश पवार हा आपल्या मित्रांसोबत सोमवारी गौताळा अभयारण्याच्या कुशीत असलेला धारेश्वर धबधबा पाहण्यासाठी गेला होता. धबधब्याचा आनंद घेत असताना तो दगडावरून सेल्फी काढत होता. त्याचवेळी त्याचा पाय घसरून खाली पडला. मित्रांसोबत असताना तो सेल्फी काढण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर ही घटना घडली.

हेही वाचा: Mumbai University Exams Canceled : मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा रद्द!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.