ETV Bharat / city

दिलासादायक! पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या आत

author img

By

Published : Jun 12, 2021, 8:25 PM IST

पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात झपाट्याने कमी झाली आहे. दुसरी लाट जोमात असताना पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी रेट हा १५ टक्क्यांच्या वर गेला होता. हा पॉझिटिव्हीटी रेट आता ४.९ टक्के इतका खाली आल्याने पुणेकरांवरील टांगती तलवार सध्या तरी हटली आहे.

पुण्याचा पॉझिटिव्हीटी रेट
पुण्याचा पॉझिटिव्हीटी रेट

पुणे - पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात झपाट्याने कमी झाली आहे. दुसरी लाट जोमात असताना पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा १५ टक्क्यांच्या वर गेला होता. हा पॉझिटिव्हिटी रेट आता ४.९ टक्के इतका खाली आल्याने पुणेकरांवरील टांगती तलवार सध्या तरी हटली आहे.

२३९ नवे रुग्ण

गेल्या काही दिवसात शहरात नव्याने आढळणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५००च्या खाली येत गेली. शुक्रवारी तर शहरात २३९ नवे रुग्ण आढळले तर ३६७ जण कोरोनातून बरे झाले. शहरात ऑक्सिजनवर असलेल्या, तसेच गंभीर रुग्णांची संख्यादेखील कमी झाली आहे. एप्रिल-मे मध्ये ५० हजारावर गेलेली शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३३२०वर आली आहे. तर यातले पन्नास टक्क्यांपेक्षा ज्यास्त रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असल्याने रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे.

अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ३३२०

ही परिस्थिती पाहता खासगी रुग्णालयातील कोविड-१९ साठी राखीव ठेवलेले ८० टक्के बेड कमी करून आता ४० टक्केच बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. सध्या शहरात ८७६२ बेड खाली आहेत. शुक्रवारी पुण्यात कोरोनाबाधित १९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातले ११ पुण्याबाहेरील आहेत. सध्या ५१९ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अनेक बेड रिकामे

शहरात शुक्रवारी दिवसभरात सहा हजार ७६ जणांची तपासणी करण्यात आली. शहरात आतापर्यंत २५ लाख ६७ हजार ४१२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी चार लाख ७३ हजार ५३९ जण कोरोनाबाधित आढळले तर त्यातले चार लाख ६१ हजार ७६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आतापर्यंत आठ हजार ४५६ मृत्यू नोंदवले गेले आहेत.

हेही वाचा - नाशिक -बिबट्याकडून घराबाहेर झोपलेल्या कुत्र्याची शिकार; थरार सीसीटीव्हीत कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.