ETV Bharat / city

Sushma Andhare On Devendra Fadnavis गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत नियमांच उल्लंघन; ध्वनिप्रदुषणाच्या नियमांचा विसर, सुषमा अंधारेचा फडणवीसांवर हल्लाबोल

author img

By

Published : Sep 3, 2022, 3:41 PM IST

Updated : Sep 3, 2022, 3:48 PM IST

Sushma Andhare On Devendra Fadnavis राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री पुणे दौऱ्यावर होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली शहरात सकाळी विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले होते. त्यांनतर रात्री 8:30 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी शहरातील मानाचे गणपती मंडळ तसेच विविध गणेश मंडळांना भेट दिली. रात्री 10:30 नंतर शहराचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ Pune Mayor Murlidhar Mohol यांच्या कोथरूड येथील मंडळात फडणवीस यांनी भेट दिली.

Sushma Andhare On Devendra Fadnavis
Sushma Andhare On Devendra Fadnavis

पुणे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री पुणे दौऱ्यावर होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली शहरात सकाळी विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले होते. त्यांनतर रात्री 8:30 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी शहरातील मानाचे गणपती मंडळ तसेच विविध गणेश मंडळांना भेट दिली. रात्री 10:30 नंतर शहराचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ Pune Mayor Murlidhar Mohol यांच्या कोथरूड येथील मंडळात फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कोथरूडमध्ये रात्री उशिरा ढोल ताशे, स्पिकर, साऊंड सुरू होते. उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नियमांच उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळाले आहे.

सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल

मंडळाला भेट द्यायला फडणवीस आले गणेश उत्सवात सुरवातीच्या 5 दिवस रात्री रात्री 10 वाजेपर्यंतच स्पिकर, साऊंड, ढोल ताशा वाजवायला परवानगी आहे. मात्र फडणवीसांच्या स्वागतासाठी कोथरूडमध्ये रात्री 10:30 नंतरही ढोल ताशे स्पिकर, साऊंड सुरू होते. माजी महापौर मुरलीधर मोहोळ Pune Mayor Murlidhar Mohol यांच्या मंडळाला भेट द्यायला फडणवीस आले होते. फडणवीस यांच्या स्वागतासाठी स्पिकर आणि ढोल ताशांचा आवाज सुरु होता. यावेळी घटनास्थळी असलेल्या पोलिसांना विचारले असता पोलिसांची नो कमेंट्स अशी दबावयुक्त प्रतिक्रिया ऐकायला मिळाली आहे.

नियमांचा विसर यावरून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री फडणवीस आणि कार्यकर्त्यांवर टिका केली आहे. आमच्याकडे सत्ता आहे, आम्हांला कोण अडवणार, असा काहींचा समज झाला आहे. असे म्हणत सुश्मा अंधारे यांनी भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांवर निशाणा साधला आहे. ध्वनिप्रदुषणाच्या नियमांचा विसर गृहमंत्री फडणवीस यांना पडला आहे. फडणवीस स्वता ध्वनिप्रदूषणाचे नियम मोडत असतील तर सामान्यांनी कोणाकडे बघायचे ? अशी टिका करत शिवसेना उपनेत्या सुश्मा अंधारे यांनी घडल्या प्रकारावर कारवाई न करणाऱ्या पोलिसांनाही लक्ष्य केले आहे.

हेही वाचा CM Eknath Shinde letter To Governor : महाविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या 'त्या' १२ आमदारांचा पत्ता कट; मुख्यमंत्री राज्यपालांना देणार नवीन यादी

Last Updated : Sep 3, 2022, 3:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.