ETV Bharat / city

यशोगाथा शहनवाजची, जिद्दीने बनली पुण्यातील पहिली मुस्लिम प्रथमवर्ग न्यायाधीश!

author img

By

Published : May 20, 2022, 5:21 PM IST

Updated : May 20, 2022, 7:39 PM IST

पुण्यातील लोहियानागर येथे राहणारी शहनवाज पठाण हिने 24 एप्रिलला दुसऱ्या प्रयत्नात प्रथमवर्ग न्यायाधीश या परीक्षेत यश संपादन ( success story shahnawaz ) केले. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून ती याची तयारी करत होती. आणि आज ती पुण्यातील पहिली मुस्लिम महिला न्यायाधीश झाली असून तिच्या या यशाचा सर्वत्र कौतुक होत आहे. ( first muslim girl from pune become a judge )

first muslim girl from pune become a judge
पुण्यातील पहिली मुस्लिम प्रथमवर्ग न्यायाधीश

पुणे - जिद्द, चिकाटी आणि परिश्रम केल्याने कोणतीही अशक्य गोष्टी शक्य होते. हे नेहमी आपण वाचत आलोय. याची प्रचिती अनेक उदाहरणातून आपण पहातच आलो आहेत. अशीच जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर समाजातील लोकांचा विरोध असताना देखील पुण्यातील झोपडपट्टीत राहणारी शहनवाज पठाण ही पुण्यातील पहिली मुस्लिम प्रथमवर्ग न्यायाधीश झाली आहे. ( first muslim girl from pune become a judge )

तिच्या या यशाचे सर्वत्र होते आहे कौतुक - पुण्यातील लोहियानागर येथे राहणारी शहनवाज पठाण हिने 24 एप्रिलला दुसऱ्या प्रयत्नात प्रथमवर्ग न्यायाधीश या परीक्षेत यश संपादन केले. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून ती याची तयारी करत होती. आणि आज ती पुण्यातील पहिली मुस्लिम महिला न्यायाधीश झाली असून तिच्या या यशाचा सर्वत्र कौतुक होत आहे.

शहनवाजची प्रतिक्रिया

आपल्या 4 ही मुलींना चांगल्या दर्जाचा शिक्षण दिले - पुण्यातील लोहियानगर येथे राहणारे अमन खा पठाण यांचे लोहीयानगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून किराणाचे दुकान आहे. त्यांना 4 मुली आणि एक मुलगा आहे. पठाण हे सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांना त्यांच्या आयुष्यात जो शिक्षणासाठी त्रास झाला. तो त्रास आपल्या पाल्यांना होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या 4 ही मुलींना चांगल्या दर्जाचा शिक्षण दिले आणि मुली शिकली की सर्व घर शिकतो, याच विचाराने त्यांनी त्यांच्या मुलींना शिक्षण दिले. त्यांची सर्वत्र छोटी मुलगी शहनवाज हिला त्यांनी तिच्या आवडीनुसार शिक्षण देऊन आज न्यायाधीश केले आहे. मुलींच्या शिक्षणाला विरोध केला तरीही मुलींना शिक्षण दिले.

वडिलांची होती इच्छा - आजही अल्पसंख्याक समाजात मुलींनी जास्त शिक्षण घेऊ नये असे सांगितले जाते. असे असताना अमन पठाण यांची इच्छा होती. की त्यांच्या मुलींनी शिकावे यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि आहे त्याच झोपडपट्टीत राहून मुलींना शिक्षण दिले. पाहिले मुलीचं शिक्षण मग घर अस विचार करून त्यांनी मुलींना शिक्षण दिले. आणि यात त्यांना त्यांच्या भावाने त्यांना मदत देखील केली. समाजातील काही लोकांनी मुलींच्या शिक्षणाला विरोध केला असताना देखील पठाण यांनी मुलींना शिक्षण देऊन शहनवाज हिला न्यायाधीश केले आहे.

first muslim girl from pune become a judge
शहनवाज आपल्या कुटुंबासोबत

माझ्या या यशामागे माझे वडील आणि काका - मला नेहेमी माझ्या शिक्षणासाठी घरच्यांचा सपोर्ट हा पहिल्यापासूनच होता.कधीही वडिलांची आर्थिक परिस्थिती ही माझ्या आणि माझ्या बहिणीच्या शिक्षणात आड आली नाही.लोक वडिलांना सांगत होते की कशाला मुलींना शिकवत आहे.पण तरीही वडिलांनी आम्हाला शिक्षणात कोणतीही गोष्ट मधी न आणता नेहमी खंबीरपणे आमच्या मागे उभे राहिले आणि आज माझ्या या यशामागे माझे वडील असल्याचं शहनवाज हिने सांगितले आहे.

हेही वाचा - UPSC साठी सोडली अमेरिकेतील नोकरी....पाहा देशात 37 वा आलेल्या विनायक नरवडेची यशोगाथा

Last Updated : May 20, 2022, 7:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.