ETV Bharat / city

Indo-Pak Border Shivaji Maharaj Statue : भारत-पाक सीमेवर १5 हजार फूटावर छत्रपती शिवरायांचा पुतळा; मूर्तिकार तरुणाशी खास बातचीत

author img

By

Published : Feb 4, 2022, 5:04 PM IST

छत्रपती शिवरायांचा हा अश्वारुढ पुतळा समुद्र सपाटीपासून १४ हजार ८०० फूट उंचीवर बसवण्यात ( Indo Pak border shivaji Maharaj statue ) आला आहे. त्यामुळेच हा छत्रपती शिवरायांचा जगताला पहिला पुतळा आहे. जो इतक्या उंचीवर बसवण्यात आला आहे. भारत-पाकिस्तान सीमेवरून काही अंतरावरच महाराजांचा अश्वारूढ पुतळा विराजमान ( shivaji maharaj statue erected on border ) झाला आहे. एलओसीवर बसवण्यात आलेला महराजंचा हा पुतळा असा बसवण्यात आला आहे की महाराजांची नजर थेट नंगा पर्वताकडे आहे, आणि यामुळे महाराज जणू शत्रूकडे नजर ठेवत आहेत असेच दिसत आहे.

Indo-Pak Border Shivaji Maharaj Statue
भारत-पाक सीमेवर शिवाजी महाराजांचा पुतळा

पुणे - गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ आहे जम्मू-काश्मीरच्या मच्छल खोऱ्यात भारत-पाकिस्तानच्या सीमारेषेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळ्याचा ( shivaji maharaj statue erected on border ).

भारत-पाक सीमेवर शिवाजी महाराजांचा पुतळा

उंच ठिकाणी बसवलेला जगातील पहिला पुतळा -

छत्रपती शिवरायांचा हा अश्वारुढ पुतळा समुद्र सपाटीपासून १४ हजार ८०० फूट उंचीवर बसवण्यात ( Indo-Pak border shivaji Maharaj statue ) आला आहे. त्यामुळेच हा छत्रपती शिवरायांचा जगताला पहिला पुतळा आहे. जो इतक्या उंचीवर बसवण्यात आला आहे. भारत-पाकिस्तान सीमेवरून काही अंतरावरच महाराजांचा अश्वारूढ पुतळा विराजमान ( shivaji maharaj statue erected on border ) झाला आहे. एलओसीवर बसवण्यात आलेला महाराजांचा हा पुतळा असा बसवण्यात आला आहे की महाराजांची नजर थेट नंगा पर्वताकडे आहे, आणि यामुळे महाराज जणू शत्रूकडे नजर ठेवत आहेत असेच दिसत आहे. गेल्या १४ वर्षांपासून मराठा रेजिमेंट ( Maratha Regiment ) काश्‍मीर खोऱ्यात सीमेवर तैनात आहे. शत्रूशी लढणाऱ्या या जवानांना महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये दररोज मिळत राहावे या अनुषंगाने मच्छल येथे शिवाजी महाराजांचा हा पुतळा बसविण्यात आला आहे.

पुण्यातील २५ वर्षीय तरुणाने बनवला आहे पुतळा -

हा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला. तेव्हा साऱ्यांनाच हा प्रश्न पडला होता की हा पुतळा नेमका कुणी तयार केला आणि इतक्या उंचीवर बसवला कुणी. पुण्यातीलच एका 25 वर्षीय मूर्तीकाराने हा पुतळा तयार केला आहे. पुण्याच्या धायरी परिसरात राहणाऱ्या अजिंक्य लोहगावकर या तरुणाने पुण्यात असलेल्या आपल्या स्टुडिओतच हा पुतळा तयार केला आहे. मराठा बटालियनचे कर्नल प्रणय पवार यांनी हा पुतळा तयार करून घेतला असून सध्या छत्रपती शिवरायांचा हा पुतळा मच्छर खोऱ्यात तब्बल चौदा हजार आठशे फूट उंचावर दिमाखात उभा आहे. हा पुतळा पाहून खरच आनंद होत आहे. पण मी इथेच न थांबता, छत्रपती शिवरायांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा मला बनवायचा आहे, अशी भावना अजिंक्य लोहगावकर या तरुणाने बोलून दाखवली आहे.

हेही वाचा - Banda Tatya Karad Controversial Statemet : बंडातात्या यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी, भाजप आक्रमक; बीड आणि पुण्यात आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.