ETV Bharat / city

TET Exam Scam : टीईटी 2019मध्ये घोटाळा; अपात्र ७ हजार ८०० परीक्षार्थींकडून पैसे घेऊन केले पात्र

author img

By

Published : Jan 28, 2022, 3:44 PM IST

Updated : Jan 28, 2022, 6:26 PM IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ( Maharashtra State Examination Council ) २०१९-२०मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये ( Scam in Teacher Eligibility Test ) अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थीकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचे निष्पन्न ( Scam in TET Exam 2019 ) झाले आहे. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात हे निष्पन्न झाले आहे. अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. त्याचबरोबर २०१८ मधील परीक्षेमध्येही मोठ्या प्रमाणावर अपात्र परीक्षार्थीकडून पैसे घेऊन पात्र ठरविले असून त्याची पडताळणी देखील सुरू आहे.

TET Exam Scam
टीईटी 2019मध्ये घोटाळा

पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ( Maharashtra State Examination Council ) २०१९-२०मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये ( Scam in Teacher Eligibility Test )अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थीकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचे निष्पन्न ( Scam in TET Exam 2019 ) झाले आहे. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात हे निष्पन्न झाले आहे. अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. त्याचबरोबर २०१८ मधील परीक्षेमध्येही मोठ्या प्रमाणावर अपात्र परीक्षार्थीकडून पैसे घेऊन पात्र ठरविले असून त्याची पडताळणी देखील सुरू आहे.

प्रतिक्रिया

पेपरफुटीमध्ये 40 आरोपींना अटक -

टीईटीच्या 2019 ची परीक्षा जी 2020 मध्ये झाली होती. त्याबाबत तपास केला असता पुणे पोलिसांना जवळपास 7800 लोकांचा नाव समोर आला आहे. ज्यांनी चुकीचे सर्टिफिकेट काढून पास झाले आहे. ती यादी पुणे पोलीस शासनाकडे देणार आहे. पेपरफुटी प्रकरणात जवळपास 40 आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास देखील पोलीस करत आहे. असं देखील यावेळी अमिताभ गुप्ता म्हणाले.

त्या उमेदवारांवर कारवाई -

याबाबत राज्य परीक्षा परिषदीचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांना विचारले असता ते म्हणाले की, जे 7800 परीक्षार्थी सायबर पोलिसांनी शोधून काढलेत. ते आता सेवेत असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्यांच्यावर कारवाई ही विभागाच्या मार्फत होणार आहे. परिषदेचे किंवा कोणत्याही विभागाचे कोणीही त्यात सहभागी असतील तर त्यांच्यावर ही कारवाई होईल. फेब्रुवारी 2013 पासून ते 2020-21 पर्यंत नियुक्त असलेल्या शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र विभागाने मागवले आहेत. त्यानुसार आतापर्यंत केवळ 6 हजार 86 प्रमाणपत्र आमच्याकडे आलेले आहे. त्यातही जर बोगस असतील तर त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई होईल. जोपर्यंत 7 हजार 800 अपात्र परिक्षार्थींची नावे आम्हाला मिळत नाही तोपर्यंत अपात्र उमेदवार सेवेत आहेत की नाही हे सांगता येणार नाही. पण ती यादी आल्यानंतर या सर्व उमेदवारांवर कारवाई करण्यात येईल असे यावेळी जगताप म्हणाले.

तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थी हे अपात्र -

शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागाचे सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक केली होती. या प्रकरणाचा तपास करीत असताना राज्य परीक्षा परिषदेकडून पोलिसांनी मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांनी केली. २०१९-२०च्या परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ परीक्षार्थींना पात्र करण्यात आले होते. प्रत्यक्षात पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थी हे अपात्र होते. तरीही त्यांना निकालामध्ये पात्र ठरविण्यात आल्याचे दिसून आले आहे. आता ही यादी पोलीस लवकरच शासनाच्या समोर ठेवणार असून शासन या उमेदवारांवर कारवाई करेल. टीईटीच्या परिक्षेबाबत पुणे पोलिसांना ही माहिती फक्त 2019 च्या परिक्षेबाबत मिळली असून या प्रकरणात अजून अपात्र उमेदवारांची यादी येण्याची देखील शक्यता आहे.

'...अन्यथा परीक्षा रद्द करा' -

2019 व 20मधील टीईटीच्या परीक्षेत जो गोंधळ झाला त्या ओएमआर शिटने दिसून आले. त्यात 7800 उमेदवार जे चुकीच्या पद्धतीने पात्र दाखवले. हे फक्त 2019-20चे समोर आले आहे. हे प्रकरण 2013 पासून चालू असणार आहे. यासाठी 2013 पासून जे परीक्षार्थीं आहेत. भले ते शिक्षक असो या विद्यार्थी त्याच्या सर्व पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्राची चौकशी व्हावी. आणि जी 2021 ला टीईटी परीक्षा घेतली त्याचा निकाल हा ओएमआर शिटसह डिस्प्ले करावा अन्यथा ती परीक्षा रद्द करावी. अशी मागणी युवाशाही संघटनेने केली आहे.

हेही वाचा - Sale of Wine in Supermarkets : वाईन विक्रीमुळे राज्याचा काय होणार फायदा?

Last Updated :Jan 28, 2022, 6:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.