ETV Bharat / city

Sambhaji Bhides Controversial Statement : इस्लाम हाच खरा आपल्या देशाचा शत्रू - संभाजी भिडेंनी ओकली गरळ

author img

By

Published : Mar 18, 2022, 3:04 PM IST

Updated : Mar 18, 2022, 3:29 PM IST

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे म्हणाले, की जरी औरंगजेब आज नसला तरी पाकिस्तान, बांगलादेश आणि मुसलमानांच्या रूपाने शिल्लक आहे. झाले गेले विसरून जाऊ या, नवीन जगासोबत चालू या, असे म्हणणारी वृत्ती सुशिक्षीत लोकांत फार मोठ्या प्रमाणात आहे. हेच आपल्या देशाचे दुर्दैव आहे.

संभाजी भिडे
संभाजी भिडे

पुणे- शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे ( Shivpratishthans Sambhiji Bhide ) हे नेहमीच वादग्रस्त विधाने करून अडचणीत सापडतात. त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. इस्लाम हाच खरा आपल्या देशाचा शत्रू आहे, असे सांगत संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला ( Sambhajis controversial statement ) तोंड फोडले आहे.

काय म्हणाले संभाजी भिडे ?
शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे ( Sambhai Bhides controversial statement ) म्हणाले, की जरी औरंगजेब आज नसला तरी पाकिस्तान, बांगलादेश आणि मुसलमानांच्या रूपाने शिल्लक आहे. झाले गेले विसरून जाऊ या, नवीन जगासोबत चालू या, असे म्हणणारी वृत्ती सुशिक्षीत लोकांत फार मोठ्या प्रमाणात आहे. हेच आपल्या देशाचे दुर्दैव आहे.

संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य

हेही वाचा-शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी घेतलं शनी देवाचं दर्शन, घातलं 'हे' साकडं
पुढे भिडे म्हणाले, की संभाजी महाराज औरंगजेबाला शरण गेले नाहीत. देशाभिमान न सोडता ऐन तारुण्यात मरण पत्करले. पण इस्लाम पत्करला नाही. याच कारणाने औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केली. इस्लाम आपल्या देशाचा खरा शत्रू असल्याचे म्हटले. अनेक रुपात गावोगावी तो नांदत आहे. संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहून इस्लामला उत्तर देण्याची ताकद आपण मिळविली ( Sambhai Bhide in Pune ) पाहिजे.

हेही वाचा-कोरेगाव भीमा दंगल : भिडे, एकबोटे यांच्यावर कारवाई करणार - गृहमंत्री

ही आहेत यापूर्वीचे भिडेंची वादग्रस्त वक्तव्य ( Controversial statements of Sambhaji Bhide )

  • कोरोना काळात मोठ्या प्रमाणात लोकांचा भीतीने मृत्यू झाला आहे.
  • डॉक्टर हे मारायच्या लायकीचे आहेत.
  • नाका तोंडाला मास्क लावणे हा फालतूपणा आहे. तरुणांनी नाक तोंड असेच झाकून ठेवणे योग्य दिसत नाही.
  • कोरोनाला अजिबात घाबरू नका. कोरोना हा केवळ आणि केवळ डॉक्टरांचा नालायकपणा ( Sambhaji Bhide comment on doctors ) आहे.
  • आंबा खाल्ल्याने मुलगा होतो.
Last Updated : Mar 18, 2022, 3:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.