ETV Bharat / city

Masculine Game of Female Police Constable : पोलीस दलातील खरी मर्दानी; छत्रपती शिवरायांच्या युद्धकलेचा वारसा जपत देत आहे महिलांना मोलाचा संदेश

author img

By

Published : Sep 15, 2022, 1:57 PM IST

Updated : Sep 15, 2022, 2:33 PM IST

पुण्यातील गणेशोत्सव हा ( Ganeshotsav is Happening in Pune ) मोठा उत्साहात होत ( Ganeshotsav in Pune with Great Enthusiasm ) असताना त्याचा कामाचा फार मोठा भाग म्हणजे पोलीस कर्मचारी असतात. हे पोलीस कर्मचारी रात्रंदिवस बंदोबस्तात करीत असतात. परंतु, पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये जसे विविध अंगी देखावे दिसतात तसेच आपल्या अंगी असलेले गुणसुद्धा सादर करण्याची एक संधी सर्वांनाच भेटत असते आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये पुण्यामध्ये खाकीतली मर्दानी दिसली होती. त्यांचा तो खेळ प्रचंड व्हायरल झाला ( Masculine Game of Female Police Constable ) होता.

Masculine Game of Female Police Constable
पोलीस दलातील खरी मर्दानी नीलम पाटील

पुणे : पुण्यातील गणेशोत्सव हा मोठा उत्साहात होत असताना त्याचा कामाचा फार मोठा भाग म्हणजे पोलीस कर्मचारी ( Ganeshotsav is Happening in Pune ) असतात. हे पोलीस कर्मचारी रात्रंदिवस बंदोबस्तात करीत असतात. परंतु, पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये जसे विविध अंगी देखावे दिसतात तसेच आपल्या अंगी असलेले गुणसुद्धा सादर करण्याची एक संधी सर्वांनाच भेटत असते आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये पुण्यामध्ये खाकीतली मर्दानी दिसली होती. त्यांचा तो खेळ प्रचंड व्हायरल ( Masculine Game of Female Police Constable ) झाला होता.

महिला पोलीस कॉन्स्टेबल नीलम पाटील यांचा खेळ

महिला पोलीस कॉन्स्टेबलचा मर्दानी खेळ : कुठल्याही काठी फिरवणाऱ्या तरबेज योद्धासारखे खाकीतली ही मर्दानी पुण्यातल्या एका मिरवणुकीमध्ये काठी फिरवताना पाहायला मिळालेली होती. कोण आहेत या खाकीतल्या मर्दानगी पोलीस, कसे असते यांचे दिवसभराचे काम आणि आपला छंद कसे जोपासत आहे पाहा. रात्रभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. पुण्यात तर विसर्जन मिरवणुकीने सगळे रेकॉर्ड तोडले. 31 तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या या गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्वात जास्त चर्चा झाली ती पोलिसांच्या डान्सची. मात्र, त्यापेक्षाही जास्त लक्ष वेधले आहे महिला पोलीस कॉन्स्टेबल नीलम पाटील यांनी.

दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीची विसर्जन मिरवणुकीत केला खेळ : पुणेकर भक्तीभावाने लाडक्या गणरायाला निरोप देत असताना. पुण्यातील मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीची विसर्जन मिरवणूक निघाली होती, या मिरवणुकीत महिला वाहतूक पोलीस नीलम पाटील यांनी मर्दानी खेळ दाखवत सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतले होते. नीलम पाटील या 13 वर्षांपासून पोलीस दलात आपली सेवा बजावत आहेत. सध्या त्या खडक वाहतूक विभागात कार्यरत आहेत. नीलम पाटील म्हणतात की त्यांना युद्ध कला जोपासण्याचा पहिल्यापासून मनातून ओढ होती आणि ती जोपासण्यासाठी मी कायम प्रयत्नशील आहे.

कला जोपासण्यासाठी नीलम पाटील यांचा आटोकाट प्रयत्न : या युद्धकलेच्या प्रशिक्षणासाठी नीलम पाटील ह्या पुण्यातील छत्रपती शिवाजी राजे मर्दानी आखाडामध्ये जात आहेत. गेल्या दीड वर्षापासून ही कला जोपासण्यासाठी नीलम पाटील या ड्युटी आणि घर सांभाळून अतोनात प्रयत्न करीत आहेत. आपली जी युद्ध कलेची परंपरा आहे ती आता नष्ट होत चालली आहे. तिच संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. या कलेचा वारसा आपण पुढील पिढीला दिला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार समाजाला एकत्र घेत या युद्धकलेच्या जोरावर अटकेपार झेंडे रोवले. आता त्याच कलेचा वारसा राज्यातील इतर महिलांना देऊन त्यांना स्वतःचे रक्षण करण्यासाठी सक्षम बनवण्याचा माझा इरादा असल्याचे नीलम पाटील सांगतात.

नीलम पाटील यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून कौतुक : पुण्याची मिरवणूक ही खूप वेळ चालली. त्यात मानाच्या पाच गणपतीची विसर्जन मिरवणूक ही अतिशय पारंपरिक पद्धतीने होत असते. त्यात या युद्धकलेचे प्रात्यक्षिक करीत मला मिरवणुकीचा भाग होता आले, याचे खूप समाधान वाटत असल्याचदेखील नीलम पाटील यांनी सांगितले. कर्तव्य बजावत असतानादेखील मला या मिरवणुकीचा भाग होता आले, याचे खरेच खूप छान वाटते. आता तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून मला प्रेम मिळत आहे.

महिलांना दिला मोलाचा संदेश : प्रात्यक्षिक दाखविल्यानंतर महिला पोलीस काॅन्स्टेबल म्हणाल्या की,यातून महिलांना मी एक संदेश देऊ इच्छिते की, आता तुमच्या स्वतःच्या रक्षणासाठी तरी हे कलागुण नक्की शिकून घ्या. तसेच आपल्या परंपरेचा वारसा पुढे देण्यासाठी युद्धकलेचे संगोपन आणि संवर्धन तितकेच गरजेचे असल्याचेदेखील नीलम पाटील यांनी सांगितले. 31 तासांहून अधिक काळ चाललेल्या मिरवणुकीत नीलम पाटील यांनी दाखवलेल्या मर्दानी खेळांचं संपूर्ण राज्यभरातून कौतुक होत आहे, अशातच पोलीस दलातील या डॅशिंग मर्दानीने राज्यातील महिलांना दिलेला संदेश हादेखील तितकाच महत्त्वाचा आहे.

हेही वाचा : Vedanta Foxconn Agitation : वेदांत, फॉक्सकॉन प्रकरणी राष्ट्रवादीचे पुण्यात जोरदार आंदोलन

Last Updated : Sep 15, 2022, 2:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.