ETV Bharat / city

नितेश राणे आणि नीलम राणे यांच्याविरोधातील लुकआऊट नोटीस पुणे पोलिसांनी केली रद्द

author img

By

Published : Oct 14, 2021, 11:41 PM IST

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांना पुणे पोलिसांकडून लुकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते. ती लुकआउट नोटीस आता पुणे पोलिसांनी रद्द केली आहे.

rane
नितेश राणे

पुणे - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांना पुणे पोलिसांकडून लुकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते. ती लुकआउट नोटीस आता पुणे पोलिसांनी रद्द केली आहे. पुणे गुन्हे शाखेने ही नोटीस पाठवली होती. २५ कोटींच्या कर्जाची परतफेड न केल्याने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर लुकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते.

हेही वाचा -पूर्ण बहुमताने सरकार द्या गोव्याचा दुप्पट वेगाने विकास करतो - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

  • कर्जातील २५ कोटी रुपये थकल्याची माहिती समोर आली होती -

नीलम राणे आर्टलाइन प्रॉपर्टीज कंपनीने डीएचएफएलकडून सुमारे ४० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कंपनीच्या कर्जासाठी नीलम राणे आणि नितेश राणे सहअर्जदार आहेत. या कर्जाची परतफेड केलेली नसल्याची तक्रार डीएचएफएलकडून करण्यात आली होती. न्यायालयाच्या परवानगीने पुणे गुन्हे शाखेने आमदार नितेश राणे आणि नीलम राणे यांना लुकआऊट सर्क्युलर पाठवले होते. कर्जातील २५ कोटी रुपये थकल्याची माहिती समोर आली होती.

  • दीड महिन्यात भरले पैसे -

पुणे गुन्हे शाखेकडे या संबंधी तक्रार आली होती. त्यानंतर संबंधित न्यायालयाकडून आदेश आल्यानंतर लुकआऊट नोटीस जारी केली होती. डीएचएफएलकडून तक्रार करण्यात आल्यावरच ही कारवाई करण्यात आली होती. लुकआउट नोटीस जारी झाल्यानंतर देश सोडून जाता येत नाही. हे परिपत्रक एक वर्षापर्यंत किंवा तपास यंत्रणा रद्द किंवा नुतनीकरण करेपर्यंत वैध राहते. 25 कोटींच्या कर्जाची परतफेड न करण्यात आल्याने कंपनीकडून पोलिसात तक्रार करण्यात आली होती. लुकआउट नोटीस जारी केल्यानंतर दीड महिन्यात राणेंनी पैसे भरले असल्याने ही नोटीस रद्द करण्यात आली आहे.

हेही वाचा - मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका; किरीट सोमैया ट्वीटमध्ये म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.